फोटो सौजन्य- pinterest
श्रावण पौर्णिमा अध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेल्यास विशेष मानली जाते. तर काही राशीच्या लोकांना यावेळी नशिबाची साथ मिळणार आहे. कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि पौर्णिमा तिथीला देखील स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. ज्यावेळी या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळी त्यांचा प्रभाव अधिक वाढलेला असतो. यावेळी श्रावण पौर्णिमेला घडणारा योगायोग काही राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा योगायोग 30 वर्षानंतर घडत आहे ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगायोगाचा काही राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना पैसा, करिअर आणि नातेसंबंधांमध्ये अधिक शुभ परिणाम मिळू शकतात.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तीन ग्रह त्यांच्या स्वतःच्या राशीत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह स्वतःच्या राशीत असतो त्यावेळी तो सर्वात शक्तिशाली आणि शुभ मानला जातो. या दिवशी चंद्र, गुरु आणि शनि त्यांच्या स्वतःच्या राशीत असतो. ज्यामुळे एक शक्तिशाली योग निर्माण होतो. याशिवाय, या दिवशी इतर काही शुभ योग देखील तयार होत असल्याने या पौर्णिमेचा प्रभाव आणखी वाढेल.
पंचांगानुसार, यावेळी श्रावण पौर्णिमा शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी रक्षाबंधंनाचा सण देखील साजरा केला जाणार आहे. यावेळी श्रावण नक्षत्र आणि गुरु पुष्य योग देखील तयार होत असल्याने हा दिवस अधिक शुभ आणि दुर्मिळ बनतो.
वृषभ राशीच्या लोकांसाठी पौर्णिमेचा दिवस खूप शुभ राहणार आहे. या लोकांना करिअरच्या क्षेत्रामध्ये मोठे यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी मिळू शकतील. जे लोक व्यवसायाशी संबंधित आहे अशा लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. नातेसंबंधामध्ये गोडवा राहू शकतो.
सिंह राशीच्या लोकांना पौर्णिमेच्या दिवशी नशिबाची साथ लाभेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळू शकते. व्यवसायामध्ये नवीन संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊन तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी श्रावण पौर्णिमेचा दिवस खूप शुभ राहणार आहे. या काळात तुमची कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. तसेच आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला खूप चांगला फायदा मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)