Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025 : शिवामूठ म्हणजे काय ? श्रावणातच महादेवांना शिवामूठ का वाहिली जाते ?

श्रावण हा अध्यात्मिक मास म्हटला जातो. या काळात देवधर्म आणि व्रत वैकल्य केली जातात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा शिवभक्त करतात. शिवामूठ म्हणजे काय याची अध्यात्मिक बाजू जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 22, 2025 | 06:59 PM
Shravan 2025 :  शिवामूठ म्हणजे काय ? श्रावणातच महादेवांना शिवामूठ का वाहिली जाते ?
Follow Us
Close
Follow Us:

श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा शिवभक्त करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं. त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात. हीच शिवामूठ म्हणजे काय आणि श्रावणातच ती का वाहिली जाते हे जाणून घेऊयात.

काय आहे धार्मिक महत्व

शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मुठ, त्याला शिवामूठ असं म्हणतात.
श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला अर्पण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात, असे मानले जाते. म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात. शिवामूठमध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा समावेश असतो. हे धान्य पंचतत्त्वांचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही तत्त्वे संतुलित राहावी. तसंच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रम्ह विष्णू आणि महादेव आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवामूठ अर्पण केली जाते.

Vastu Tips: महादेवाची पूजा करुन वास्तूदोष करा दूर, घरात येईल सुख समृद्धी

शिवामूठ वाहण्याचं शास्त्रीय कारण

श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते. शेतीची भरभराट व्हावी आणि पिक चांगल यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात. प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात. उदा. मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं, उडीद हे बलवर्धक मानलं जातं. त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते. निसर्ग आपल्याला कायमच भरभरुन देत असतो. पृथ्वीवरील सर्वच सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो. त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामूठ वाहण्यात येते. निसर्गाप्रति कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो. शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग, समर्पण, कृतज्ञता, आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे. असं अध्यात्म सांगतं. हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महदेवांचं वास्तव्य असतं. त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं. महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि व आंतरिक शांतता लाभते.

Mangal Gochar: मंगळ ग्रह करणार नक्षत्र बदल, या राशीच्या लोकांना समाजात मिळणार मान सन्मान

 

 

Web Title: Shrawan 2025 what is shivamuth why is shivamuth offered to mahadev in shrawan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Lord Shiva
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व , काय आहेत याची शास्त्रीय कारणं ?
1

रुद्राक्षाच्या माळेला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे मोठं महत्व , काय आहेत याची शास्त्रीय कारणं ?

कैलास पर्वतावर ड्रोन उडवताच कॅमेरात कैद झाले अद्भुत दृश्य; स्वप्नातही विचार केला नसेल असा नजारा, 1 मिलियन व्युज अन् Video Viral
2

कैलास पर्वतावर ड्रोन उडवताच कॅमेरात कैद झाले अद्भुत दृश्य; स्वप्नातही विचार केला नसेल असा नजारा, 1 मिलियन व्युज अन् Video Viral

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय
3

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत
4

Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.