फोटो सौजन्य- pinterest
वास्तूशास्त्रात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेले आहे. ज्या घरामध्ये वास्तू चांगली राहते. त्या घरामध्ये सुख समृद्धी असते. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील टिकून राहते. जर तुमच्या घरात वास्तूदोष असल्यास त्या कुटुंबामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या जास्त असतात.
त्याचसोबत कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तसेच जीवनामध्ये समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. वास्तुशास्त्रामध्ये असे काही नियम आणि तत्वे सांगण्यात आलेली आहे ज्याचे पालन केल्याने घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होते.
हिंदू धर्मामध्ये महादेवांना विनाश आणि पुनर्बांधणीचा देव मानला जातो. असे मानले जाते की, घरामध्ये महादेवांची धार्मिकरितीने पूजा केल्याने वास्तूदोष दूर होतात. श्रावण महिना सुरु होणार आहे यावेळी शिवपूजेचे महत्त्व खूप वाढते. श्रावण महिन्यामध्ये शिवपूजन केल्याने घरातील वातावरण आध्यात्मिक आणि सुसंवादी बनते.
श्रावण महिन्यात महादेवाची योग्य पद्धतीने पूजा करणे आणि महामृत्यूजंय मंत्रांचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तूदोष देखील दूर होण्यास मदत होते.
श्रावण महिन्यातील शिवरात्रीचा दिवस रुद्राभिषेक करण्यासाठी शुभ मानला जातो. रुद्राभिषेक करताना गंगाजल, दूध, दही, मध, तूप इत्यादी पदार्थ शिवलिंगाला अर्पण केले जातात. रुद्राभिषेक केल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते अशी मान्यता आहे.
वास्तूदोष दूर करण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी. त्याची स्थापना घराच्या ईशान्य दिशेला करावी. वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची स्थापना केल्याने घरामधील सकारात्मकतेचा प्रवाह वाढू लागतो.
शिवपुराणात म्हटल्यानुसार, ज्या घरामध्ये शिवलिंगाची योग्य पद्धतीने पूजा केली जाते किंवा इतर देवी देवतांची नियमितपणे पूजा केली जाते त्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा आकर्षित राहते. यामुळे वास्तूदोष दूर होण्यास मदत होते.
श्रावण महिन्यात शिवपूजा करताना गंगाजल, बेलपत्र, शमीपत्र, रुद्राक्ष, डमरू इत्यादी गोष्टींचा वापर करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी वाढते. या वस्तू महादेवांना प्रिय असल्याने त्या अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात.
भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज सकाळी शिव चालीसाचे पठण करणे खूप फायदेशीर आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)