फोटो सौजन्य- pinterest
शुक्र ग्रह गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी सिंह राशीपासून कन्या राशीत संक्रमण करणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना हे संक्रमण खूप शुभ आणि फायदेशीर राहणार आहे. या दरम्यान कन्या राशीमध्ये सूर्याने संक्रमण केल्याने प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. तसेच करिअर आणि व्यवसायात देखील अपेक्षित यश मिळेल. या काळात व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे संक्रमण अनुकूल आणि फायदेशीर असणार आहे. यावेळी शुक्राचे संक्रमण तुमच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या घरामध्ये होणार आहे. या संक्रमणामुळे तुमच्या घरात आनंद येऊ शकतो. जे लोक नवीन घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या या काळात इच्छा पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. या लोकांच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या घरात संक्रमण होणार आहे. या संक्रमणाचा फायदा तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी होऊ शकतो. मित्राकडून व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित असाल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तसेच समाजामध्ये मान सन्मान देखील मिळू शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ असणार आहे. या संक्रमणाचा फायदा करिअर आणि व्यवसायात अनपेक्षितपणे होताना दिसून येऊ शकतो. या काळात काही चांगल्या बातम्या देखील ऐकायला मिळू शकता. या काळात आर्थिक परिस्थितीतही सकारात्मक बदल होतील. कला, संगीत आणि साहित्यात रस असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप चांगले असणार आहे. या संक्रमणाचा फायदा नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना होऊ शकतो. तसेच या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास आणि जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. या काळामध्ये मीडिया आणि चित्रपट उद्योगात काम करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळेल. तसेच आरोग्यही चांगले राहील.
शुक्राचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. हे संक्रमण वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. या संक्रमणादरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित नोकरी करण्याची संधी मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)