
फोटो सौजन्य- pinterest
शुक्र ग्रह धनु राशीत संक्रमण करणार आहे. वृश्चिक राशीनंतर रविवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी शुक्र ग्रह धनु राशीत 24 दिवस अस्ताच्या स्थितीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यामुळे काही राशींसाठी शुक्राचा प्रभाव आव्हानात्मक होईल. यानंतर 12 जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत अस्त होऊन संक्रमण करेल आणि 31 जानेवारी रोजी सकाळी 7.5 वाजता त्याचा उद्य होणार आहे. अशा वेळी कर्क, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे अस्ताचे संक्रमण अशुभ ठरणार आहे. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, तर काहींना नातेसंबंधातील तणाव, आर्थिक दबाव आणि करिअरमधील अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. शुक्राचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांना आव्हानात्मक ठरणार आहे ते जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे संक्रमण सहाव्या घरात होणार आहे. यावेळी चौथ्या आणि अकराव्या घरामध्ये शुक्र ग्रहाचे राज्य राहील. या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो. अचानक खर्च वाढल्याने तुमच्या बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या असतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हे संक्रमण आव्हानात्मक असू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहावे.
शुक्र राशीचे धनु राशीमधील संक्रमण दुसऱ्या घरामध्ये होत आहे. या प्रभावामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या कारकिर्दीत, कामाशी संबंधित प्रवास वाढल्याने थकवा आणि मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसायिकांना चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक राहील.
शुक्र ग्रहाचे संक्रमण धनु राशीमध्ये पहिल्या घरामध्ये होणार आहे. या काळात कर्ज वाढण्याची शक्यता जास्त आहे. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. या काळात तुमच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. मानसिक ताण देखील वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये अडथळे येऊ शकतात. यावेळी तुमच्या आर्थिक परिस्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो.
मीन राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचे राज्य आहे. यावेळी शुक्र ग्रह धनु राशीच्या दहाव्या घरामध्ये आहे. या प्रभावामुळे दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. यामुळे ताण येऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला दिसत नाही. कामाच्या ठिकाणी असंतोष वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी अस्थिरता देखील संभवते. व्यावसायिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान पैसे खर्च होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात तणावाचे वातावरण जाणवू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शुक्र ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्या घटनेला शुक्र गोचर म्हणतात. शुक्र प्रेम, वैवाहिक जीवन, सौंदर्य, विलास, कला आणि आर्थिक सुखांचा कारक मानला जातो.
Ans: धनु राशीतील शुक्रामुळे विचारसरणी, नातेसंबंध आणि खर्चाच्या सवयींमध्ये बदल दिसू शकतात. काही राशींना लाभ होईल, तर काहींनी सावध राहणे आवश्यक ठरते.
Ans: अपेक्षा वाढतात, पण गैरसमजही होऊ शकतात. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर नाती मजबूत राहू शकतात