Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: शुक्र ग्रह करणार कन्या राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना मिळणार प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता

शुक्र ग्रहांचे हे संक्रमण काही राशींच्या फायदेशीर राहणार आहे. आर्थिक, व्यावसायिक, प्रेम आणि कौटुंबिक जीवनात दिलासा व आनंदाच्या संधी मिळतील. शुक्र ग्रह कन्या राशीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 27, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 1 ऑगस्टला शुक्र ग्रह करणार कन्या राशीमध्ये प्रवेश
  • शुक्र ग्रहांच्या संक्रमणामुळे या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळणार यश
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जेव्हा एखादा ग्रह आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा सर्व १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. यावेळी शुक्र ग्रह शनिवार, १ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रानुसार, शुक्र ग्रह सुखसोयी, प्रेम, सौंदर्य, संपत्ती, समृद्धी आणि चांगल्या संबंधांचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, त्यांना वाढीव आकर्षण, आनंद आणि भौतिक सुखाचा अनुभव येतो. शिवाय, जेव्हा शुक्राचे गोचर अनुकूल असते, तेव्हा अनेक लोकांचे नशीब बदलू शकते.

शुक्र ग्रहांचे हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात दिलासा व आनंदाच्या संधी मिळू शकतात. दीर्घकाळापासूनच्या समस्या कमी होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील. शुक्र ग्रह कन्या राशीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

हे शुक्र संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम आणू शकते. करिअरमध्ये नवीन टप्पे गाठले जाण्याची शक्यता आहे, आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व पगारवाढीचा फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल आणि तुमच्या कामातील कामगिरीची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सुखसोयी आणि प्रगतीचा आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठे प्रकल्प येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, तसेच मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्याच्या योजनाही प्रत्यक्षात येऊ शकतात.

सिंह रास

शुक्राचे हे संक्रमण या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ राहणार आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि बऱ्याच काळापासून पडून असलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंध अधिक गोड होतील, तुमचे प्रेमजीवन सुखद राहील आणि वाहन मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत.

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

मकर रास

शुक्राचे हे संक्रमण या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती आणि यशाच्या नवीन संधी घेऊन येईल. भाग्याची साथ मिळाल्याने, रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यावसायिक दौऱ्यांमुळे फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक करारही निश्चित होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र ग्रह कन्या राशीत कधी प्रवेश करणार?

    Ans: वैदिक पंचांगानुसार शुक्र ग्रह ठराविक दिवशी कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे काही राशींवर शुभ परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

  • Que: शुक्राच्या कन्या राशीतील गोचराचा सर्वाधिक लाभ कोणत्या राशींना होऊ शकतो?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

  • Que: शुक्र ग्रहाचे कन्या राशीतील संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार

    Ans: शुक्र ग्रहाचे कन्या राशीतील संक्रमणाचा वृषभ, मिथुन, सिंह आणि मकर राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Shukra gochar venus will enter virgo people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Kashmir History: काश्मीरला ऋषीमुनींची तपोभूमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास
3

Kashmir History: काश्मीरला ऋषीमुनींची तपोभूमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास

Chaturmas 2026: चातुर्मासात शुभ कार्ये का टाळली जातात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
4

Chaturmas 2026: चातुर्मासात शुभ कार्ये का टाळली जातात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.