फोटो सौजन्य- pinterest
शुक्र ग्रहाचा आज रविवार, 29 जून रोजी मेष राशीमधील प्रवास संपत आहे. आता हा ग्रह स्वतःच्या वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत असल्याने या लोकांना जास्त फायदा होणार आहे.
मंगळाची असलेली रास मेष ती सोडून शुक्र ग्रह आज स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करत आहे. यामुऴे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामधील गोडवा कायम राहील. शुक्र ग्रह आता 26 जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये असणार आहे त्यानंतर तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
शुक्र ग्रहाला सौंदर्याचे प्रतीक मानले जात असल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये भौतिक सुखसोयी आणि सुविधांवर यांचा परिणाम होतो. शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आराम, आदर, शारीरिक आणि मानसिक आनंद मिळतो. अशी मान्यता आहे.
शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील सुख, समृद्धी आणि सौभाग्यामध्ये वाढ होते. या ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये तेजस्वी ग्रह मानला जातो. कुंडलीमध्ये याची स्थिती शुभ असल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ होतो. त्यासोबतच वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो.
एखाद्या वेळेस कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकुवत असल्यास व्यक्तीला जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र, कन्या राशीत सर्वात खालच्या राशीत आणि मीन राशीत सर्वात उच्च राशीत असल्याचे म्हटले जाते.
शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे या राशीमधील नोकरी करणाऱ्या लोकांच्या जीवनात असलेल्या समस्या संपतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. कामाच्या निमित्ताने तुम्ही परदेश दौरा करण्याची शक्यता आहे.
शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत संक्रमण करत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ राहणार आहे. या राशीचे लोक नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता या लोकांची आर्थिक स्थिती सुधारलेली राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. कन्या राशीची लोक या संक्रमणादरम्यान नवीन वाहन खरेदी करु शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.
या राशीच्या लोकांना संक्रमणाचा फायदा होईल. कामाच्या निमित्ताने हे लोक बाहेर गावी जाऊ शकतात. परिवारातील वातावरण चांगले राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामामध्ये यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)