फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित मानला जातो. शनिदेवाला न्यायाची देवता आणि कर्माचे फळ देणारा दाता असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ मिळते. जर कुंडलीमध्ये शनिची साडेसाती, धैय्या आणि महादशा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकटे, आर्थिक समस्या आणि अडथळे इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. खासकरुन ज्या लोकांना सारखे आर्थिक नुकसान सहन करावे लागते त्या लोकांना व्यवसायामध्ये देखील तोटा सहन करावा लागतो. तसेच या लोकांना नोकरीमध्ये देखील स्थिरता मिळत नाही. शनिदेवाचा आशीर्वाद मिळणे हे फायदेशीर ठरते.
शनिवारी असे काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होते. शनिवारी कोणते उपाय करावे जाणून घ्या
शनिवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन देवाला मोहरीचे तेल अर्पण करुन ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा जप करा. त्यानंतर, गरजूवंतांना काळे कपडे, काळे तीळ, उडीद डाळ, बूट, चप्पल किंवा ब्लँकेट या गोष्टींचे दान करावे. असे मानले जाते की, या गोष्टींचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून त्याला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते. शक्य झाल्यास झा़डाभोवती सात फेऱ्या माराव्यात. त्यानंतर शनिदेवाचे ध्यान करुन प्रार्थना करणे. हे उपाय केल्याने कुंडलीमधील शनिदोष दूर करण्यासाठी मदत होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते.
ज्योतिषशास्त्रात हनुमानाला शनिदेवाचे खास मित्र मानले जाते. शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण केल्याने शनिदोष दूर होतो आणि मानसिक शांती मिळते. तसेच जीवनात येणारे आव्हाने कमी होतात, अशी मान्यता आहे.
शनिवारी संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. त्याचसोबत ओम प्रम प्रीम प्रौण सह शनैश्चराय नम: किंवा ओम शाम शनैश्चराय नम: या मंत्रांचा शक्य असल्यास 108 वेळा जप करा. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी हा सोपा उपाय मानला जातो.
शनिदेवाला न्यायी आणि गरिबांचे रक्षक मानले जात असल्याने यावेळी गरजूंना अन्नदान करावे, अपंग लोकांची मदत करावी. गरीब आणि गरजूंची सेवा केल्याने शनिदोष कमी होऊन जीवनात आर्थिक स्थिरता आणण्यास मदत करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)