
फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, 2026 मध्ये शुक्र एकूण 42 दिवसांसाठी वक्री होणार आहे. शनिवार 3 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.45 वाजता शुक्र ग्रहाची वक्री गती सुरू होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.57 वाजेपर्यंत ते याच स्थितीत राहणार आहे. सुख, समृद्धी, संपत्ती आणि प्रेमाचा कर्ता शुक्राची वक्री गती सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करणार आहे. शुक्र वक्रीचा कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे ते जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांवर शुक्र वक्री गतीचा अनेक परिणाम होताना दिसून येणार आहे. जर तुमचा तुमच्या जोडीदाराशी किंवा जवळच्या मित्राशी वाद होत असेल, तर मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. या 42 दिवसांमध्ये तुमच्या खर्चामध्ये घट होताना दिसून येईल. या काळात तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल.
शुक्र वक्रीचा कन्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या जीवनातील समस्या दूर होणार आहे. सहकाऱ्यांशी तुमचा समन्वय सुधारेल. या काळात आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. विशेषतः, तुम्हाला पचन आणि त्वचेशी संबंधित आजारांपासून आराम मिळेल. या ४२ दिवसांत तुम्ही दीर्घकालीन फायदे देणारा मालमत्तेचा व्यवहार अंतिम करू शकाल अशी अपेक्षा आहे.
शुक्राच्या वक्री गतीचा धनु राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम करणारा आहे. या काळात तुम्हाला अज्ञात स्त्रोतांकडून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच आर्थिक समस्या कमी होऊन बचत वाढू शकते. तुम्ही मालमत्ता गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय या काळात घेऊ शकतात. नातेसंबंधांमधील गैरसमज पूर्णपणे नाहीसे होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जेव्हा पृथ्वीवरून पाहताना शुक्र ग्रह सरळ न चालता मागे जात असल्यासारखा दिसतो, त्या अवस्थेला शुक्र वक्री म्हणतात. हा खगोलशास्त्रीय परिणाम असून ज्योतिषशास्त्रात त्याचा विशेष प्रभाव मानला जातो.
Ans: 2026 मध्ये शुक्र सुमारे 42 दिवस वक्री अवस्थेत राहणार आहे. या काळात प्रेम, नाती, सौंदर्य आणि आर्थिक बाबींवर विशेष परिणाम दिसून येतो.
Ans: या काळात जुनी नाती, थांबलेले प्रेमसंबंध, अपूर्ण आर्थिक व्यवहार पुन्हा पुढे येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास सकारात्मक बदल संभवतात.