फोटो सौजन्य- pinterest
जगामध्ये सर्वात मोठे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण 2 ऑगस्ट 2027 मध्ये होणार आहे. यावेळी हे ग्रहण युरोप, उत्तर आफ्रिका आणि अरबस्तानच्या काही भागात दिसणार आहे. ज्यावेळी सूर्यग्रहण होणार आहे या वेळेची खास गोष्ट म्हणजे ते फक्त 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार आहे, असे म्हणणे आहे. या सूर्यग्रहणाला वर्षातील सर्वांत मोठे ग्रहण मानले जाते.
खगोलशास्त्रीयदृष्ट्या पाहायला गेल्यास हे सूर्यग्रहण सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी आकाश अंधारात बुडालेले असेल. हे सूर्यग्रहण अलीकडील इतिहासात कधीही न पाहिलेले असेल आणि पुढील 100 वर्षांपर्यंत दिसणार नाही. येणारे सूर्यग्रहण हे शेकडो वर्षातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असल्याचे म्हटले जाते. इतिहासामध्ये असलेले पूर्ण सूर्यग्रहण इसवी सन पूर्व 743 मध्ये झाले होते. त्यावेळी हे सूर्यग्रहण 7 मिनिटे 28 सेकंद पाहायला मिळाले होते.
2 ऑगस्ट 2027 रोजी होणारे सूर्यग्रहणाची सुरुवात अटलांटिक महासागरातून होणार आहे. याचा मार्ग 275 किलोमीटर रुंद राहील आणि तो अनेक खंड व्यापणार आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिकेतील बहुतेक देशांमधून दिसेल. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनी, दक्षिण स्पेन, उत्तर आफ्रिकेतून अरबी द्वीपकल्पात जाईल. दरम्यान हे सूर्यग्रहण हिंदी महासागरात अस्पष्ट असेल.
पूर्ण सूर्यग्रहण पहिल्यांदा दक्षिण स्पेन, जिब्राल्टर आणि मोरोक्को या ठिकाणी दिसेल. त्यानंतर सूर्यग्रहण अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया आणि इजिप्तमध्ये सर्वोच्च ठिकाणी असल्याचे दिसून येईल. इजिप्तनंतर, सूर्यग्रहण लाल समुद्र ओलांडेल आणि सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया अंधारात टाकेल. कॅडिझ आणि मालागा ही स्पेनची शहरे चार मिनिटांपेक्षा जास्त काळ पूर्ण अंधारात राहतील. ज्यावेळी हे सूर्यग्रहण दिसणार आहे त्यावेळी खगोलशास्त्र प्रेमी आणि पर्यटक दोघांसाठीही एक ऐतिहासिक अनुभव बनवेल.
ज्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये थेट जातो त्यावेळी पूर्ण सूर्यग्रहण तयार होते. त्यामुळे पृथ्वीवरील एका विशिष्ट प्रदेशात सूर्याची संपूर्ण डिस्क तो व्यापतो. 2 ऑगस्ट 2027 रोजी याचा मार्ग 160 मैल रुंद असेल आणि आफ्रिका, आशिया, युरोप या तीन खंडांमधून ते जाईल.
2027 मधील होणारे हे सूर्यग्रहण भारत आणि आसपासच्या देशांमध्ये दिसणार नाही आहे. त्यामुळे भारतीयांना काही प्रमाणात निराशा होऊ शकते. हे सूर्यग्रहण पाहायचे असल्यास लिबियातील बेनघाझी हे एक चांगले ठिकाण आहे. इजिप्तचे ऐतिहासिक शहर लक्सर सूर्यग्रहणाच्या वेळी 6 मिनिटांसाठी अंधारात असणार आहे. तर इटलीमधील लॅम्पेडुसा बेट जवळजवळ पूर्णपणे झाकले जाईल. सौदी अरेबियातील जेद्दा आणि मक्का, येमेन आणि सोमालियाचे काही भाग हे ग्रहण पाहण्यासाठी शेवटची ठिकाणे असतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)