फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाच्या घरामध्ये चारही दिशांना विशेष महत्त्व असते. मात्र घरामधील ईशान्य दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते. या दिशेचा संबंध मानसिक शांती, विचार, मेंदूची शक्ती आणि सकारात्मक उर्जेशी असल्याचे मानले जाते. मात्र या दिशेला तुम्ही चुकीच्या वस्तू ठेवल्यास त्याचे परिणाम तुमच्या आरोग्य, विचारसरणी आणि जीवनात प्रगती करण्यावर होतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले आहे की ईशान्य दिशेला कोणत्या वस्तू ठेवणे योग्य आहे तर कोणत्या वस्तू ठेवू नये.
तुम्ही घरामध्ये ईशान्य दिशेला कचरा, तुटलेल्या वस्तू, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स किंवा निरुपयोगी वस्तू ठेवल्यास तुम्हाला जीवनामध्ये अनेक अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. ज्यांच्याकडे ही जागी जेवढी स्वच्छ असेल अशा लोकांची ऊर्जा तुमच्या घरात टिकून राहते. मात्र तुमची या दिशा जर खराब असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते.
ईशान्य दिशेच्या भिंतींवर खिळे ठोकणे ही एक चुकीची गोष्ट आहे. जर ही खिळे जमिनीपासून 7 फूट उंचीवर असल्यास शरीराच्या नसा आणि मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेद आणि वास्तूशास्त्रात उल्लेख केल्यानुसार, आपल्या घरामध्ये मरम स्थान नावाची काही बिंदू असतात ज्याचा संबंध भिंतीच्या किंवा संरचनेच्या संबंधित असलेल्या ऊर्जा आपल्या शरीराच्या उर्जेवर परिणाम करते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी खिळा लावत असाल तर त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. जसे की, मानसिक ताण, वारंवार डोकेदुखी, गोंधळ किंवा लक्ष केंद्रित न होणे ही संकेत असू शकतात.
जर तुम्हाला घरामध्ये फोटो फ्रेम किंवा सजावटीच्या वस्तू लटकवायच्या असल्यास खिळ्यांऐवजी डबल टेप किंवा वॉल हुक वापरा. त्यामुळे भिंतीवर कोणत्याही प्रकारचे छिंद्र पडणार नाही. उर्जेचा प्रवाह देखील योग्य राहील.
वास्तूशास्त्रानुसार, 7 फूट उंचीला ‘ऊर्जा क्षेत्र’ मानले जाते. यावेळी चुकीच्या पद्धतीने लावल्यास घरामधील ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे भिंतीवर काहीतरी जड टांगले गेले किंवा भिंतीवर छिद्र पाडले तर घरातील व्यक्तीला मानसिक थकवा, कमकुवत स्मरणशक्ती किंवा अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्हाला घरामध्ये शांती आणि तुमचे विचार सर्जनशील राहावे असे वाटत असल्यास नेहमी ईशान्य दिशा स्वच्छ आणि मोकळी ठेवावी. मात्र ईशान्य दिशेला पाण्याशी संबंधित कोणत्याही वस्तू तुम्ही ठेवू शकता. जसे की, पाण्याचे भांडे, देव्हारा, ध्यान करण्यासाठी जागा इत्यादी गोष्टी ठेवणे फायदेशीर ठरेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)