फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 21 सप्टेंबर रोजी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. हे ग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10.59 ते पहाटे 3.23 या वेळेत असेल. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सुतक काळ वैध राहणार नाही. मात्र ज्योतिषीय घटनानुसार याचा परिणाम राशी आणि जगावर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.
पंचांगानुसार, 21 सप्टेंबर रोजी बुध हस्त नक्षत्रात, राहू ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रात सकाळी 11.50 वाजता आणि चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रात दुपारी 3.57 वाजता संक्रमण करणार आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र, मनाचा कर्ता, आई, मानसिक स्थिती, निसर्ग, बुध, वाणी, संवाद, त्वचा, व्यवसाय आणि पाप ग्रह राहू यांच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या.
सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र, बुध आणि राहू यांचे होणारे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता आणेल. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांची नेतृत्व क्षमता वाढेल आणि कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील. जे लोक गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा लोकांचा आजार या काळात बरा होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये वाढ होईल.
मिथुन राशीची लोक या काळात समाजात एक नवीन ओळख तयार करतील. नवीन संपर्कांमुळे सामाजिक संवाद वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांपासून सुटका होईल. हा काळ तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार नाही. त्यासोबतच नात्यांमध्ये प्रेम वाढेल आणि बोलणे मऊ होईल. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन संपर्क वाढल्याने भविष्यात तु्म्हाला व्यवसायासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. नात्यात गोडवा येईल आणि कौटुंबिक जीवन संतुलित राहील.
मेष आणि मिथुन राशीव्यतिरिक्त वृश्चिक राशीच्या लोकांना देखील सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र, बुध आणि राहूच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांच्या कारकिर्दीत काही मोठे यश मिळवू शकतात. तसेच या काळात तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. नात्यामध्ये सावधगिरी बाळगावी. कला क्षेत्रातील काम करणाऱ्या तरुणांना समाजात मान सन्मान मिळेल.
रविवारी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचे ज्योतिषीय परिणाम खोलवर होऊ शकतात. मात्र हा दिवस मेष, मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)