फोटो सौजन्य- pinterest
आचार्य चाणक्य हे राजकारण आणि जीवनाचे राजनयिक म्हणून ओळखले जातात. चाणक्यची नीतीमध्ये शतकानुशतके नेतृत्व, यश आणि जीवन व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम सूत्रे देण्यात आली आहेत. यावेळी त्यांचे विचार राजकीय रणनीतीपुरते मर्यादित नसून ते दैनंदिन जीवनासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक अमूल्य सूत्रे त्यांनी सांगितलेली आहेत. चाणक्यांनी त्यांची नीतीशास्त्रामध्ये गाढवाशी संबंधित काही खास गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या सवयी आपण अंगीकारतो त्या सवयी कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात स्थिरता, समाधान आणि यश मिळवू शकतो. चाणक्याच्या विश्वासानुसार, माणूस प्रत्येकाकडून काहीतरी शिकू शकतो, मग तो माणूस असो किंवा प्राणी. गाढवाला अनेकदा आळशी मानले जाते. मात्र त्याचे हे गुण आपल्यासाठी आजही प्रेरणादायी आहेत. कोणते आहेत ते गुण जाणून घ्या
गाढवाच्या या समर्पणाद्वारे चाणक्याने मानवांना संदेश दिला आहे की, यामध्ये त्यांनी म्हटल्यानुसार जीवनात ध्येयासाठी वचनबद्ध राहणे किती महत्त्वाचे आहे. परिस्थिती कितीही कठीण असो किंवा लोक तुम्हाला कितीही निराश करण्याचा प्रयत्न करत असले तरी, जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिलात तर यश निश्चित आहे. यामुळे आळस आणि भीती तुमच्या मनातून काढून टाका.
गाढव जे काही मिळते ते समाधानाने स्वीकारतो. त्याचप्रमाणे चाणक्य सांगतात की, समाधान आणि संयमच माणसाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. निकालाची चिंता न करता खूप मेहनत घ्या हीच तर खरी यशाची गुरुकिल्ली आहे. चाणक्यांच्या मते, जीवनात समाधानी असलेला माणूस कठीण परिस्थितीतही स्थिर राहतो आणि लहान प्रयत्नांना एकत्रित करून मोठे परिणाम मिळवू शकतो.
गाढव आळस न करता सतत काम करतो. चाणक्याच्या मते, माणसानेही आळस सोडून खूप मेहनत घ्यावी. कारण लहान प्रयत्न देखील कालांतराने मोठ्या परिणामांमध्ये बदलतात. जो माणूस सतत मेहनत घेऊन परिश्रम करतो त्याला अखेर यश मिळते.
आचार्याच्या म्हणण्यानुसार, गाढव प्रत्येक ऋतूत आपले काम करत राहते. तसाच मानवांवरही हवामान थंड किंवा उष्ण असल्याने त्याचा परिणाम होऊ नये. जर एखाद्या व्यक्तीचे थंडी आणि उष्णतेमुळे त्याच्या कर्तव्यापासून लक्ष विचलित होत असल्यास तो ध्येयापासून देखील विचलित होऊ शकतो
या सवयी आपण अंगीकारल्यास कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. चाणक्याच्या धोरणानुसार, गाढवाकडून हे साधे पण प्रभावी गुण शिका आणि तुमचे जीवन यशाच्या मार्गावर पुढे घेऊन जा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)