Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swami Narayan Jayanti: सेवा, श्रद्धा आणि समर्पण, स्वामीनारायण जयंतीचे काय आहे महत्त्व

स्वामी नारायण जयंती हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. हा दिवस भगवान स्वामीनारायण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. स्वामीनारायण संप्रदाय हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 27, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्वामी नारायण जयंती कधी आहे
  • स्वामीनारायण जयंतीचे महत्त्व
  • स्वामीनारायण यांची शिकवण

स्वामीनारायणांचे जीवन व कार्य

भगवान स्वामीनारायण यांचा जन्म इ.स. १७८१ मध्ये छपिया येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव घनश्याम होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची गोडी होती. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून लोकांना धर्म, नैतिकता आणि सदाचाराचा संदेश दिला.

स्वामीनारायणांनी समाजातील अंधश्रद्धा, कुरीती आणि अन्याय यांना विरोध केला. त्यांनी लोकांना सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि ईश्वरभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या शिकवणीमुळे समाजात शांती, एकता आणि नैतिक मूल्यांची जपणूक झाली. तत्कालीन समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे.

उत्सव साजरा करण्याची पद्धत

स्वामीनारायण जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये आणि घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भगवान स्वामीनारायण यांची विशेष पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन आणि सत्संग धार्मिक प्रवचन आणि कथा, मध्यरात्री जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानंतर प्रसादाचे वितरण केले जाते.

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी करा देवी सिद्धीदात्रीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि नैवेद्य

या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूर्ण दिवस ईश्वरभक्तीत रमून जातात. स्वामीनारायण संप्रदायाचा सर्वात मोठा आणि मुख्य भक्त परिवार गुजरात राज्यात आहे, जिथे अहमदाबाद आणि वडताल येथे मुख्य केंद्रे (गादी) आहेत. याव्यतिरिक्त, स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी मुंबई, महाराष्ट्र, भारतभर आणि अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारख्या परदेशातही मोठ्या संख्येने पसरलेले आहेत. तसेच बीएपीएस (BAPS) संस्थेचे जगभरात मोठे जाळे आहे.

समाजासाठी संदेश

स्वामीनारायण जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो — सदाचार, सेवा आणि समर्पण. आजच्या काळातही त्यांच्या शिकवणी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांनी शिकवले की, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, संयम आणि सेवा वृत्ती ठेवली पाहिजे.

Zodiac Sign: राजराजेश्वर योगाचा वृषभ आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

स्वामीनारायणांच्या शिकवणीचे आधुनिक महत्त्व

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात स्वामीनारायणांच्या शिकवणी अधिकच उपयुक्त ठरतात. त्यांनी दिलेले मूल्ये प्रामाणिकपणा, संयम, सेवा आणि श्रद्धा ही प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारी आहेत.

त्यांचा संदेश असा आहे की, “स्वतःचे जीवन शुद्ध ठेवा आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करा.” आजच्या समाजात वाढणारी असहिष्णुता, ताणतणाव आणि नैतिक अधःपतन यावर उपाय म्हणून त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे. स्वामीनारायणांचे भक्त त्यांचे विचार देशाविदेशात पोहोचविण्यासाठी तन, मन, धन अर्पण करतात. त्यांच्या विचार, त्यांचे शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी स्वामीनारायण संप्रदाय प्रचंड मेहनत घेत आहे. आज जगभरातील स्वामीनारायण यांची भव्य दिव्य मंदिरे, तेथील सामाजिक उपक्रम पाहिल्यानंतर असं दिसून येतं की, स्वामिनारायणांचे विचार विश्वभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वामीनारायण जयंती म्हणजे काय?

    Ans: भगवान स्वामीनारायण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा पवित्र उत्सव म्हणजे स्वामीनारायण जयंती.

  • Que: स्वामीनारायण जयंतीचे मुख्य महत्त्व काय आहे?

    Ans: अध्यात्मिक जागृतीसाठी, नैतिक मूल्ये वाढवण्यासाठी, समाजसेवेची प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

  • Que: स्वामीनारायणांचे जीवन आणि शिकवण काय सांगते?

    Ans: भगवान स्वामीनारायण यांनी सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि ईश्वरभक्ती यांचा संदेश दिला. त्यांनी अंधश्रद्धा आणि कुरीतींविरुद्ध समाजाला जागृत केले

Web Title: Swami narayan jayanti 2026 seva shraddha samarpan mahatva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.