फोटो सौजन्य - Social Media
आयुष्य स्वार्थापेक्षा समाजासाठी जगा. जेव्हा समाजासाठी जगाला तेव्हा आयुष्यच खरे सार्थक होईल. पुराणांमध्ये असे अनेक दानशूर होऊन गेले, ज्यांनी अन्न, वस्त्र तसेच आपले राज्यही दान केले आहे. यात कसलाही लोभ व स्वार्थ न वापरता. काही दानशूर होते ज्यांनी स्वार्थासाठी दान केलं आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘हिरण्यकश्यपू’! भक्त प्रल्हाद यांचे वडील ‘हिरण्यकश्यपू’ असुरांचा सम्राट होता, ज्याने स्वार्थासाठी अनेक दान केले आहेत. पण त्याऐवजी रावणाला पाहिले तर तोही असुर सम्राट असून त्याने दान कधीही स्वार्थ म्हणून केले नाही.
रावणाला पुराणांमध्ये ‘महादानी’ म्हणून फार उच्च दर्जा दिला गेला आहे. रावण इतका दानशूर होता की कोणताही ब्राह्मण त्याच्या समोर आला तर त्याला खाली हात त्याने कधीच पाठवले नाही. अगदी शत्रूनेदेखील साधू वेशात येऊन त्याच्यासमोर काही मागितले तरी रावणाने त्याला कधी रिकाम्या हाती जाऊ दिले नाही. अहंकारी पण दानात उदार आणि दानशूर असे रावणाचे स्वरूप मानले जाते.
अंगदेशाचा सूर्यपुत्र कर्ण हा महाभारतातील दानशूर योद्धा म्हणून ओळखला जातो. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य त्यागात घालवले तरीही त्याच्या समोर कुणी काही मागितले तरी त्याला रिकाम्या हाती जाऊ दिले नाही. मित्र प्रेमासाठी त्याने त्याचे आयुष्य त्याग केले. स्वतः इंद्रदेव याचक म्हणून त्याच्या समोर आले त्याने कसलाही विचार न करता युद्धात त्याचे रक्षण करणारे कवच कुंडल काढून त्याने इंद्र देवाच्या चरणाशी ठेवले. यापेक्षा मोठा दानी कोण!
रामायणातील रामाचा भ्राता भरतदेखील मोठा दानशूर मानला जातो. राम वनवासात गेले असता भरताकडे राजा होण्याची संधी होती. पण भरतने कधीच त्या संधीचा स्वीकार केला नाही. त्याने त्याच्या मोठ्या भावाची प्रतीक्षा केली. त्यांच्या पादुका त्याने सिंहासनावर विराजमान केले आणि राम परत आल्यावर मोठ्या थाटामाटात त्यांचा राज्याभिषेक करवून दिला. हाती सत्ता असतानादेखील त्याने ती स्वीकारले नाही, राजा बनू शकतो तरी तो राजा झाला नाही.
असे अनेक दानशूर व्यक्ती पुराणांमध्ये होऊन गेले आहेत. ज्यांची प्रचिती आपल्यास ज्ञात हवी आणि आपणही दान करावेत.