फोटो सौजन्य - Social Media
रावण म्हंटले की प्रत्येकाच्या मनात एक नकारात्मक बाजू तयार होते. अहंकारी, मत्सराने भरलेला, उंच धिप्पाड असा शरीरवृष्टी असलेला एक पुरुष! त्याच्यामध्ये नक्कीच अहंकार होता. नक्कीच त्याच्यात राग उचित होता. तो क्रोधाने वेढलेला होता. पण त्याच्या काही अशा बाजू होत्या, ज्याची साक्ष स्वतः भगवान देतात. ज्याची स्तुती स्वतः ईश्वर करतो. जे गुण संपूर्ण मानव सृष्टीसाठी प्रेरणादायी आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.
रावणाची सगळ्यात निखळ बाजू म्हणजे रावणाची भक्ती! त्याची भगवान शंकराप्रती असणारी आराधना जगव्याख्यात आहे. त्याच्यासारखा शंकर भक्त होणे अशक्यच! शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने जो दिव्य तप केला, असा तप काळाच्या पडद्यात पुन्हा लिखित नाही. ते फक्त रावणाला शक्य होते आणि त्याने ते करून दाखवले आणि शंकराकडून दिव्या शक्ती प्राप्त केली. विद्या प्राप्त केली आणि बळ, सामर्थ्य प्राप्त केले.
रावण ओळखला जातो ते म्हणजे त्याचा विद्ववतेमुळे. फक्त शास्त्र नाही तर शास्त्रातदेखील रावण कुशल होता. लढवय्या होता. इतका की त्याच्या वधासाठी स्वतः भगवान विष्णू यांना अवतार घ्यावा लागला. श्री रामरूपी अवतार धारण करू त्याच्या अहंकाराचा वध करावा लागला. रावणात बहुगुण इतके प्रखर होते की तो संगीतामध्येही प्रबळ होता. वेद आणि ज्योतिषशास्त्राचे ज्ञान त्याच्यात प्रखर होते. तो पराक्रमी, धैर्यवान होता.
आताच्या राजकर्त्याने त्याच्याकडून शिकण्याचे सगळ्यात सुंदर सद्गुण म्हणजे रावण एक उत्तम प्रतिपालक होता. त्याच्या प्रशासनात कसलाही भ्रष्टाचार व दुर्गुण नव्हते. सोन्याची नगरी वसवणे! हे काही साधी गोष्ट नाही. आताच्या प्रशासकांनी रावणाच्या या गुणाचे आत्मस्मरण करावे. सोन्याचे नव्हे निदान उत्तम रस्ते आणि कसलाही भ्रष्टाचार नसणारे देश बनवले तरीही उत्तम! रावण महादानी होता. शत्रूदेखील याचक बनून त्याच्यासमोर आला तरी त्याला दान करण्यात तो मागेपुढे पाहत नाही. त्याला पुराणांमध्ये ‘महादानी’ म्हंटले गेले आहे.
हे काही सद्गुण आहेत, जे प्रत्येक मानवाने शिकले पाहिजेत. रावणाच्या अहंकाराचा द्वेष नक्की करा. पण त्याच्या सद्गुणांना पाहणे आणि त्याचे आत्मस्मरण करणे कधीच टाळू नका.