Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 :जगातील एकमेव मंदिर जिथे मानवी चेहरा असलेल्या गणपतीची पूजा होते; ‘अशी’ आहे नरमुख गणेशाची आख्यायिका

गणपती बप्पा म्हटलं की तो डाव्या किंवा उजव्या सोंडेचा अशीच त्याच्या प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र असं एकमेव गणपती मंदिर आहे ज्या मंदिरात गणपतीची मुर्ती ही गजमुख नसून मानवी चेहऱ्याची आहे. कुठे आहे हे मंदिर जाणून घेऊयात...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 29, 2025 | 12:50 PM
Ganesh Chaturthi 2025 :जगातील एकमेव मंदिर जिथे मानवी चेहरा असलेल्या गणपतीची पूजा होते; ‘अशी’ आहे नरमुख गणेशाची आख्यायिका
Follow Us
Close
Follow Us:

गणपतीला गजमुख, वक्रतुंड, गजानन ही आणि अशी खूप नावं आहेत. याचं कारण म्हणजे हत्तीच्या सोंडेमुळे गणपती बाप्पाला पडलेली ही नावं. माता पार्वतीच्या आज्ञेनुसार, गणपती बप्पा पाहारा देत असताना त्याने महादेवांना अडवलं त्यांनर त्यांच्यात वाद प्रतिवाद झाले आणि रागाच्या भरात महादेवांनी गणपती बाप्पाचा शिरच्छेद केला. त्यानंतर गणपतीला हत्तीचं मुख लावण्यात आलं आणि मग गजमुख किंवा अशीच इतर नावं पडल्याची कथा आपल्याला माहितच आहे.

गणपती बप्पा म्हटलं की तो डाव्या किंवा उजव्या सोंडेचा अशीच त्याच्या प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र जगातील असं एकमेव गणपती मंदिर आहे ज्या मंदिरात गणपतीची मुर्ती ही गजमुख नसून मानवी चेहऱ्याची आहे. कुठे आहे हे मंदिर चला तर मग जाणून घेऊयात…

तामिळनाडुमध्ये असं एकमेव गणपती मंदिर आहे जे मानवी चेहरा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केली जाते. तामिळनाडुच्या कूथानुर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे गणेश मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचं नाव आहे आदीविनायक मंदिर. अष्टविनायक गणपती म्हणून देखील हे मंदिर ओळखलं जातं. याला नरमुख गणेश मंदिर असं देखील म्हणतात. अर्थात याचं कारण म्हणजे या गणपतीची मुर्ती मानवी चेहऱ्याची आहे. काळ्या पाषाणात कोरलेली ही मुर्ती आहे. ध्यानस्थ बसलेले मानवी चेहऱ्याचा गणपती बाप्पाची मूर्ती येथे पाहायला मिळते.

Ganesh Chaturthi 2025 : ‘अशी’ गणेशमुर्ती ज्याची प्राणप्रतिष्ठापणा ग्रहणात केली, पुण्यातील ‘या’ गणपतीची आख्यायिका आहे रहस्यमय

काही संदर्भानुसार असं देखील म्हटलं जातं की, याचा संबंध रायायणाशी येतो. प्रभू रामचंद्राने पितरांना शांती लाभावी यासाठी पूजा केली होती त्यामुळे हीच प्रथा आजतागायत सुरु आहे. या गणेशमंदिरात आपल्या पुर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून पूजा घातली जाते.

काय आहे या गणपतीची कथा ?

भगवान शंकरांनी गणपतीचा शिरच्छेद केला आणि गजमुख बसविले. मात्र आदी विनायक हा या सगळ्या घटनेच्या आधी असलेला मूळ चेहऱ्याचा गणपती आहे. या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक देश विदेशातल्या कानाकोपऱ्यातून येतात. गणेश चतुर्थी आणि महाशिवरात्रीला भाविक एकत्र येत उत्सव साजरा करतात. या प्राचीन आणि दुर्मिळ गणेशमंदिराचं सर्वांना आकर्षण वाटतं. तर अशी आहे या सुखर्ता दुखहर्ता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या रुपाची ही गोष्ट.

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण करत नाही? काय आहे यामागील पौराणिक कारण

 

 

Web Title: The only temple in the world adivinayak in tamil nadu worships ganesha with a human face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
1

Ganesh Chaturthi 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

कडक सेक्युरिटीसह थिरकताना दिसला सलमानन खान, संपूर्ण खान कुटुंबाने मोठ्या थाटामाटात केले बाप्पाचे विसर्जन
2

कडक सेक्युरिटीसह थिरकताना दिसला सलमानन खान, संपूर्ण खान कुटुंबाने मोठ्या थाटामाटात केले बाप्पाचे विसर्जन

गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोषही मोठा; तरुणाईने केवळ धिंगाण्यापेक्षा समाजसेवेकडेही द्यावे ध्यान
3

गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोषही मोठा; तरुणाईने केवळ धिंगाण्यापेक्षा समाजसेवेकडेही द्यावे ध्यान

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट
4

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.