
फोटो सौजन्य- pinterest
नोव्हेंबरचा महिना खगोलशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात राशीमध्ये अनेक बदल होणार आहे. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशीमध्ये नवीन ऊर्जा तयार होईल. त्याशिवाय अनेक लोकांच्या जीवनातही बदल घडून येणार आहेत. या काळात काही ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे विशेष योग तयार होणार आहेत. हा योग काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यामध्ये वृश्चिक राशीत मंगळ, शुक्र आणि सूर्याची युती एक शक्तिशाली योग तयार करणार आहे. ही युती तुमच्या करिअर, संपत्ती आणि यशाच्या शक्यतांना बळकटी देईल. अशा वेळी काही राशीच्या लोकांचे नशीब चमकते. त्यांना कामावर पदोन्नती, नवीन नोकरी किंवा व्यवसायात नफा मिळण्याची संधी मिळेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे.
नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहील. हा योग तुमच्या स्वतःच्या राशीत तयार होत आहे. या काळात व्यक्तीच्या आत्मविश्वासावर, व्यक्तिमत्त्वावर, विचारांवर आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूवर पडतो. सामाजिक दर्जा वाढेल. करिअर आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ खूप शुभ मानला जातो. तुम्हाला नवीन नोकरी, पदोन्नती किंवा महत्त्वाचे पद मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यासोबतच वाहन आणि मालमत्तेशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. हा काळ तुमच्यासाठी आत्म-विकास आणि यशासाठी अनुकूल राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप शुभ राहणार आहे. कारण या राशीच्या अकराव्या घरामध्ये हा योग तयार होत आहे. हे घर उत्पन्न, नफा, मैत्री आणि इच्छा पूर्ण करण्याशी संबंधित आहे. या काळात तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होईल. कोणतेही रखडलेले व्यवहार किंवा गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, सट्टेबाजी किंवा लॉटरीसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांना लोकांना अपेक्षित फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तसेच नातेवाईकांना नवीन संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
नोव्हेंबरचा महिना मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या राशीच्या कुंडलीमध्ये नवव्या घरामध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्याचा संबंध धर्म, प्रवास आणि प्रगती इत्यादीशी संबंधित आहे. या काळात तुम्हाला सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. करिअरच्या बाबतीत हा काळ प्रगतीचा राहील. नोकरी करणाऱ्यांना बदली किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहील. लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणे खूप फायदेशीर राहील. त्याचसोबत आर्थिक स्थिती सुधारेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)