Vastu Shastra: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दुःखाला आमंत्रणकधीच कोणाचा वापरलेला रुमाल घेऊ नका. चाणक्य सांगतात की रुमाल देणे आणि घेणे दोन्ही चुकीचे आहे. रुमालाने लोक घाम, अश्रू पुसतात. त्यामुळे त्यात त्या माणसाचे दुःख, त्याचे निगेटिव्ह विचार असतात.तुम्ही जर मित्राचा रुमाल फुकट घेतला तर त्याचे प्रॉब्लेम तुमच्याकडे येऊ शकतात. आणि तुम्ही जर कोणाला रुमाल भेट दिला तर तुमच्या मैत्रीत दुरावा येतो. त्यामुळे रुमाल स्वतःच विकत घ्यायचा असतो.
Vastu Tips: घराच्या खिडक्या बंद ठेवल्याने वाढू शकतात अडचणी? जाणून …
पैसा टिकत नाहीमीठ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात लागते. पण वास्तूमध्ये मिठाला शनी ग्रहाशी जोडले आहे. शनीला न्याय देणारा ग्रह मानतात.म्हणून कोणाकडूनही मीठ फुकट घेऊ नये किंवा देऊ नये. असे केल्याने घरात पैशाची अडचण येते, कर्ज वाढते. घरात सारखे वाद होतात.कधी कधी शेजाऱ्याकडून मीठ मागावे लागते. अशा वेळी रिकाम्या हाताने घेऊ नका.त्याऐवजी थोडे पैसे किंवा एखादी वस्तू येऊ शकतात.
Vastu Tips: सेकंड हँड वस्तू घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे ‘हे नियम
शनीची धातूलोखंड पण शनी देवाची धातू आहे. दरम्यान लोखंडाची वस्तू बिना पैसे देता घेणे अशुभ असते. म्हणून लोखंड नेहमी दुकानातून पैसे देऊनच घ्यावे. कोणी फुकट देत असेल तरी त्याला 10-20 रुपये देऊन मगच घ्या.या व्यतिरिक्त झाडू, तेल, पेन, घड्याळ या वस्तू पण फुकट घेऊ नयेत असे सांगतात. पण सगळ्यात जास्त महत्व या तीन वस्तूंना आहे – रुमाल, मीठ आणि लोखंड.तुम्हाला पटत असेल तर हे नियम पाळा, नाही पटले तरी हरकत नाही. पण या छोट्या गोष्टी पाळल्याने घरात चांगली एनर्जी राहते एवढे नक्की.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






