फोटो सौजन्य- istock
अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत काही चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि तुमच्या घराची समृद्धी वाढवण्यासाठी हे उपाय करा.
काही वेळा घरातील नकारात्मक ऊर्जा वाढल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. करिअरमधील समस्यांसोबतच आरोग्यातही चढ-उतार आहेत. अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत काही चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी आपल्या घरात सकारात्मक वाढवण्यासाठी आणि घराची तुमच्या घराची समृद्धी वाढवण्यासाठी वास्तुच्या या प्रभावी टिप्स नक्की वापरा.
हेदेखील वाचा- घरात स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे, जाणून घ्या वास्तू नियम
भजन कीर्तन
घराती समृद्धी वाढवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज शंख आणि घंटी वाजवा. तसेच संध्याकाळी भजन कीर्तन केल्याने नकारात्मकतेपासून दूर राहू शकता. पूजा झाल्यानंतर संपूर्ण घरात शंखपाणी शिंपडणे शुभ मानले जाते.
साफसफाई
घरातील घाण, कचरा, धूळ किंवा कोळ्याच्या जाळ्यांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. यामुळे नियमित घराची साफसफाई करणे खूप महत्त्वाचे आहे. घरात कोळ्याचे जाळे लागणारप नाही याकडे लक्ष द्या. असे म्हणतात की, घरातील जाळ्यांमुळे खर्च वाढतो.
हेदेखील वाचा- जर तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसत असतील तर समजा तुमचे नशीब चमकेल
सूर्यदेवाला प्रार्थना करा
कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात धन, समृद्धी आणि मान-सन्मानात कधीच घट होत नाही. सूर्योदयाच्या वेळी काही वेळ सूर्यकिरणांमध्ये बसल्यानेही तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी सूर्यदेवाला रोज जल अर्पण करा. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात लाल फुले, लाल रोळी, काळे तीळ आणि अक्षत ठेवून अर्घ्य द्यावे.
दिवा लावा
देवाची पूजा करताना रोज तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. तसेच संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा ठेवा. कापूर दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये समृद्धी देखील राहते.
तोरण लावा
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि ते मुख्य प्रवेशद्वारावर लावा. तोरणामध्ये वापरलेली आंब्याची पाने ही ताजी हिरवी असावी हे कटाक्षाने लक्षात ठेवा.
मिठाच्या पाण्याने फरशी पुसा
जर तुमच्या घरात दररोज निराशा वाटत असेल किंवा वारंवार संकटाचे वातावरण येत असेल, तर त्यामागचे मुख्य कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते. हीच नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पाण्यामध्ये मीठ मिसळून फरशी पुसा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
तुळशीची पूजा
दररोज तुळशीला अर्घ्य अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याचबरोबर शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुक्तमचे पठण केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. यामुळे घरात आर्थिक सुबत्ता येते.