फोटो सौजन्य- istock
वास्तूमध्ये स्वयंपाकघराशी संबंधित काही खास नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, स्वयंपाकघरातील वास्तू योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघराशी संबंधित वास्तूच्या नियमांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
हिंदू धर्मात वास्तुला खूप महत्त्व आहे. वास्तूमध्ये, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूसाठी एक विशिष्ट स्थान आणि दिशा नियुक्त केली आहे. असे मानले जाते की, वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने माणसाला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि जीवनात सुख, समृद्धी मिळते. जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी घर, स्वयंपाकघर, शयनकक्ष, मुख्य गेट इत्यादींसह अनेक गोष्टींशी संबंधित वास्तु नियम स्पष्ट केले आहेत. आज आपण घरामध्ये आशीर्वाद आणण्यासाठी किचनशी संबंधित वास्तु टिप्स जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा- जर तुम्हाला स्वप्नात या गोष्टी दिसत असतील तर समजा तुमचे नशीब चमकेल
स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू टिप्स
वास्तूनुसार, आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला स्वयंपाकघर बांधणे शुभ असते.
असे मानले जाते की, आग्नेय दिशेचे स्वामी ग्रह शुक्र आहे. या दिशेला स्वयंपाकघर असल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते.
हेदेखील वाचा- मूलांक 4 असणाऱ्यांना नशिबाची साथ लाभण्याची शक्यता
याशिवाय पूर्व दिशेलासुद्धा स्वयंपाकघर बनवू शकता.
वास्तूनुसार, स्वयंपाकघराची खिडकी मोठी असली पाहिजे. स्वयंपाकघरात नैसर्गिक प्रकाश आणि हवेची व्यवस्था असावी.
असे मानले जाते की, आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर नसेल तर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि आरोग्याबाबत काळजी वाटू शकते.
घराच्या आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर नसेल तर सिंदुरी गणेशजीची मूर्ती स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात ठेवता येते.
वास्तूनुसार घराच्या नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की यामुळे घरात घरगुती त्रासाची परिस्थिती कायम राहते.
त्याचबरोबर ईशान्य दिशेला बनवलेले स्वयंपाकघर मानसिक तणाव निर्माण करू शकते. असे मानले जाते की, त्यामुळे खर्च नियंत्रणाबाहेर जातात.
स्वयंपाक करताना दिशेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. स्वयंपाक करतेवेळी नेहमी तुमचा चेहरा पूर्वेकडे असावा. तसेच स्वयंपाक बनवणाऱ्यांच्या पाठीमागे स्वयंपाकघराचा दरवाजा नसावा.
स्वयंपाकघरातील पाणी ही एक अतिश्य आवश्य अशी वस्तू आहे. कारण स्वयंपाक करताना पाण्याची आवश्यकता असते. अशावेळी बहुतांश महिला गॅसजवळ पाणी ठेवतात. त्यामुळे संकटाची परिस्थिती उद्भवू शकते.
स्वयंपाकघरात तुटलेली भांडी वापरणे टाळा. काही वेळेस काही भांडी खराब होतात तरी आपण ती वापरत राहतो. पण ते चुकीचे आहे अशा भांड्यामध्ये कधीही अन्न शिजवू नका.