फोटो सौजन्य- istock
वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि सुख-समृद्धी वाढवण्यासाठी काही वास्तू उपाय केले जाऊ शकतात.
वास्तुशास्त्रात आर्थिक, करिअर, व्यवसाय, कौटुंबिक, वैवाहीक अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे, घरात कोणत्या दिशेला काय असावे यासाठी देखील वास्तू टिप्स उपयोगात येतात. दैनंदीन जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी हे वास्तू टिप्स फलदायी ठरतात.
जेव्हा घराची ऊर्जा सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक बनते तेव्हा समस्या निर्माण होऊ लागतात. घरातील नकारात्मक ऊर्जा वाढल्याने घरातील शांतता कमी होऊ लागते. वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि सुख-समृद्धी वाढवण्यासाठी काही वास्तु उपाय केले जाऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया, घरातील कलह कमी करण्यासाठी वास्तू टिप्स-
हेदेखील वाचा- या मूलांकाच्या लोकांना नोकरीत पढोन्नती मिऴण्याची शक्यता
सूर्याला रोज पाणी दिल्याने कुंडलीत सूर्य ग्रह बलवान होऊ शकतो. सूर्य हा ग्रह मान-प्रतिष्ठेशी संबंधित मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून, सूर्याची शुभ बाजू करिअरमध्ये यश मिळविण्यास मदत करेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्यादेखील दूर होऊ शकतात.
दररोज सकाळी घरामध्ये दिवा लावा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल. घरामध्ये पूजा योग्य प्रकारे केली तर जीवनातील दु:ख आणि आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
हेदेखील वाचा- या राशींना ग्रहांच्या संक्रमणाचा लाभ
दररोज तुळशीजींना अर्घ्य अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याचबरोबर शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुक्तमचे पठण केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
घराची साफसफाई करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे घराचे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते. त्याचबरोबर अनावश्यक वस्तू गोळा करून ठेवू नका. आज घरातून रद्दी बाहेर काढा. रोज सकाळी उठल्यावर घर स्वच्छ करा.
कधी कधी घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या आर्थिक जीवनावरही वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे पाण्यामध्ये नाम मिसळून पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.