फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूला आणि दिशेला विशेष महत्त्व असते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवलेल्या वस्तूचा आपल्या जीवनावर, नातेसंबंधांवर आणि नशिबावर परिणाम करतात. हत्तीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते. घरातील विशिष्ट दिशांना आणि ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवल्याने त्याचे परिणाम अनेक पटीने वाढतात. घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ही मूर्ती सोने, चांदी किंवा पितळेपासून बनवलेली असल्यास संपत्ती आणि समृद्धी मिळते. घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवण्याचे फायदे आणि महत्त्व जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, हत्तीची मूर्ती बेडरुममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमधील प्रेम आणि आदर वाढतो. हत्तींची जोडी वैवाहिक जीवनात स्थिरता, विश्वास आणि सुसंवादाचे प्रतीक मानली जाते.
बेडरूमच्या व्यतिरिक्त पैसे ठेवण्याच्या ठिकाणी देवी लक्ष्मीचे चित्र लावावे, ज्यांची सोंड उंचावली आहे. तसेच पैसे ठेवण्याची जागी किंवा तिजोरी ठेवलेल्या खोलीला क्रीम किंवा ऑफ-व्हाइट रंग देणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहते.
हत्तींना संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने शक्ती आणि बुद्धी यासारखे गुण देखील मिळतात. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते, असे मानले जाते.
हत्तीची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे नशीब, आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक वाढ होते. तसेच घराच्या उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती ठेवल्याने करिअर आणि व्यवसायात वाढ होते. मुख्य प्रवेशद्वारावर हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास सुसंवाद आणि शांतीचे वातावरण तयार होते. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये फक्त शांत हत्तीची मूर्ती ठेवावी. मुलांना सकारात्मक उर्जेची खूप गरज असते, म्हणून मुलांच्या बेडरुममध्येही शांत हत्तीची मूर्ती ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार हत्तीची सोंड वर असलेल्या हत्तीची मूर्ती जीवनात समृद्धी आणि सौभाग्य आणते, तर सोंड खाली असलेल्या हत्तीला शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)