Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी तुळशी किंवा रुद्राक्ष या पद्धतीने ठेवल्यास होईल फायदा

तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तुळस आणि रुद्राक्ष ठेवायचे असल्यास ते लाल कपड्यात गुंडाळून ठेवल्याने फायदा होतो. तुम्ही व्यवस्थितरित्या रुद्राक्ष आणि तुळस ठेवल्यास नकारात्मकता दूर होऊन तुमच्या संपत्तीमध्ये अपेक्षित वाढ होते

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2025 | 09:35 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • तुळस आणि रुद्राक्ष पर्समध्ये ठेवावे का
  • पर्समध्ये कोणत्या गोष्टीवर ठेवाव्यात
  • आर्थिक समस्या कशा दूर होतील

बरेच जण आपल्या पर्समध्ये अशा काही गोष्टी ठेवतात ज्या मानल्या जातात. काहींना नाणी ठेवायला आवडतात, काहींना देवाचा फोटो आवडतो तर काहींना तुळशीचे पान किंवा रुद्राक्ष मणी आवडते. मात्र आपल्या संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी वाईट नजरेपासून वाचण्यासाठी किंवा जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी असे काही उपाय केले जातात. पण आपण कधी याचा विचार केला आहे का की पर्समध्ये या वस्तू ठेवणे योग्य आहे की नाही? पूजेशी संबंधित वस्तू स्वतःजवळ ठेवणे खूप पवित्र आणि त्याचा प्रभाव देखील पडतो. पण आपण याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास आपल्या जीवनात त्याचा मोठा फरक पडताना दिसून येतो. तुळशी, रुद्राक्ष किंवा इतर पूजा साहित्य पर्समध्ये ठेवावे की नाही, जाणून घ्या

पर्स हे फक्त पैसे ठेवण्याचे साधन नसून आर्थिक स्थितीचे आणि उर्जेचे प्रतीक मानले जाते. त्याचा परिणाम आपल्या नशीब आणि मनस्थितीवर देखील होतो. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुनुसार, पर्समध्ये तुळशीचे पान किंवा रुद्राक्ष ठेवल्याने पैशाची कमतरता आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. दरम्यान, तुळशी आणि रुद्राक्ष दोन्ही खूप पवित्र मानले जातात. मात्र पर्समध्ये काही गोष्टी ठेवण्यासंदर्भात नियम सांगण्यात आलेले आहे.

Zodiac Sign: मालव्य राजयोगाचा मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

पर्समध्ये तुळशीची पाने ठेवणे

तुळशीला सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक मानले जाते. ज्या ठिकाणी तुळस वाढते त्या ठिकाणी भगवान विष्णू वास करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. असे करणे खूप शुभ मानले जाते. पर्स घाणेरडी नसावी, जुनी बिले, तिकिटे, कचरा इत्यादी वस्तू ताबडतोब पर्समधून काढून टाका. तुळशीचे पान लाल किंवा पिवळ्या कपडामध्ये गुंडाळून ठेवा. जर पान सुकले किंवा तुटले तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. तुळशीचा हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते.

पर्समध्ये रुद्राक्ष ठेवणे

रुद्राक्ष हे महादेवांचे प्रतीक आहे. त्यामुळे हे पर्समध्ये ठेवल्याने सकारात्मकता वाढते आणि मनःशांती मिळते. रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावे. जर रुद्राक्ष मणी जुनी किंवा तुटलेली असेल तर ती पर्समध्ये ठेवू नये. तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. कधीही तुमची पर्स तुमच्या कमरेखाली ठेवू नका किंवा त्यावर बसू नका.

पूजेशी संबंधित इतर गोष्टी

बऱ्याचदा आपण पर्समध्ये देवाचे फोटो किंवा चालिसा ठेवतो. दरम्यान असे करणे अशुभ मानले जाते. कारण पाकिट ही एक व्यावहारिक वस्तू आहे ज्यामध्ये आपण पैसे, पावत्या आणि कधीकधी अशुद्ध वस्तू ठेवतो. देवाचे चित्र किंवा धार्मिक ग्रंथातील पान ठेवणे अपवित्र मानले जाते. असे केल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुळशीशिवाय, कमळाच्या मणी, रुद्राक्षाचे मणी किंवा धातूच्या वस्तू यासारख्या इतर कोणत्याही पूजेच्या वस्तू पर्समध्ये ठेवू नये.

Mangal Ast 2025: 7 नोव्हेंबरला मंगळ होणार अस्त, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार परिणाम जाणून घ्या

पर्स नेहमी स्वच्छ ठेवावी

जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुळशी किंवा रुद्राक्ष ठेवत असाल तर ते फाटलेले किंवा घाणेरडे नाही याची खात्री करा. तसेच तुमची पर्स कधीही जमिनीवर ठेवू नका आणि ती नेहमी तुमच्या डोक्याच्या किंवा छातीच्या पातळीपेक्षा वर ठेवा. पर्स दररोज सांभाळणे आणि त्यातील पवित्र वस्तू वेळोवेळी बदलणे याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होतो.

तुळशी आणि रुद्राक्ष दोन्ही एकत्र ठेवता येते का

हो, पण जर दोन्ही व्यवस्थित गुंडाळलेले असतील आणि पर्सवर जास्त दाब येणार नसल्यास किंवा पर्समध्ये आधीच खूप गोष्टी असतील तर फक्त तुळशी ठेवा. रुद्राक्षाची ऊर्जा तीक्ष्ण असते, तर तुळशीची ऊर्जा मऊ मानली जाते, म्हणून दोन्ही काळजीपूर्वक एकत्र करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips benefits of keeping tulsi or rudraksha to increase wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: वर्ष संपण्यापूर्वी घरामध्ये आणा या गोष्टी, सर्व समस्यांपासून होईल सुटका
1

Vastu Tips: वर्ष संपण्यापूर्वी घरामध्ये आणा या गोष्टी, सर्व समस्यांपासून होईल सुटका

Vastu Tips: तुमच्या घरामध्ये तणाव आणि संघर्ष वाढत असल्यास करा वास्तूचे ‘हे’ उपाय
2

Vastu Tips: तुमच्या घरामध्ये तणाव आणि संघर्ष वाढत असल्यास करा वास्तूचे ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.