फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे महत्त्वाचे स्थान मानले जाते. या ठिकाणापासून घराला संपूर्ण ऊर्जा मिळते. यामुळे स्वयंपाकघराला घराचे हृदय असे देखील म्हटले जाते. स्वयंपाकघरामधील स्थितीचा परिणाम घरातील सदस्यांवर होताना दिसून येतो. स्वच्छ स्वयंपाकघर असल्याने आनंद, शांती आणि समृद्धी टिकून राहते. मात्र स्वयंपाकघर घाणेरडे असल्यास कुटुंबातील सदस्यांवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. बऱ्याचदा आपल्याकडून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे काही चुका होतात, ज्याचा कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ, मीठ आणि मिरची स्वयंपाकघरात एकाच ठिकाणी ठेवू नये. स्वयंपाकघरात मीठ आणि मिरची कुठे ठेवावी याचे वास्तूचे नियम जाणून घेऊया.
मिठाची साठवणूक करताना वास्तुच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मीठ योग्यरित्या साठवल्याने घरामधील नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो. काचेच्या भांड्यात मीठ ठेवणे नेहमीच उचित असते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. लोखंड, प्लास्टिक किंवा इतर धातूच्या भांड्यांमध्ये मीठ ठेवणे अशुभ आहे. असे केल्यास कुटुंबात समस्या आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.
शेजाऱ्यांना मीठ देताना कधीही उजव्या हाताने देऊ नये. तर ते फक्त भांड्यामधूनच द्यावे. वास्तुशास्त्रानुसार, दुसऱ्याच्या घरातून मीठ घेतल्याने गरिबी येते. मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नका, जेव्हा मीठ संपणार असेल तेव्हा त्यापूर्वी ते ऑर्डर करू नका. तसेच, शुक्रवारी नेहमी मिठाचा डबा भरा, असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह अखंड राहतो.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात मीठ, साखर आणि मिरची एकत्र ठेवल्याने कुटुंबामधील कलह आणि भांडणे वाढतात. हे तिन्ही घटक वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवावेत. मीठ, मिरची आणि साखर एकाच भांड्यात ठेवल्याने गरिबी येते आणि कुटुंबातील सदस्यांवर देखील याचा नकारात्मक परिणाम होतो.
हळद ही केवळ स्वयंपाकाघरातील साहित्यामधील घटक नसून शुभ, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक देखील आहे. त्यामुळे हळदीच्या भांड्याला विशेष महत्त्व आहे. मिठाच्या भांड्याप्रमाणे हळदीचे भांडेदेखील कधीही रिकामे ठेवू नये. हळदीच्या भांड्यात एक नाणे आणि तीन लवंगा ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हळद हे गुरू ग्रहाचे प्रतीक मानले जाते. तर नाणे हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि लवंग हे संपत्तीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, हे तिन्ही घटक एकाच ठिकाणी ठेवल्यास धन आणि सुखाची कधीही कमतरता भासत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)