फोटो सौजन्य- istock
भेटवस्तू देणे ही एक सुंदर अशी संकल्पना आहे. त्यामुळे नातेसंबंध गोड राहते आणि खास क्षण संस्मरणीय करते. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण असो, इतर काही प्रसंगी लोक त्यांच्या प्रियजनांना काही ना काही भेटवस्तू देऊन आनंदित करतात. पण तुम्हाला माहिती आहे का अशा काही वस्तू भेट म्हणून दिल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो? वास्तुशास्त्रानुसार, जर काही वस्तू एखाद्याला दिल्या तर त्या घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांनाही त्रास देऊ शकतात. प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व असते आणि भेटवस्तू निवडताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्या वस्तू भेट म्हणून देऊ नये, जाणून घ्या
बऱ्याचदा लोक चांगले दिसण्यासाठी किंवा आवड म्हणून काळे कपडे भेट म्हणून देतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार काळा रंग हा नकारात्मकतेशी संबंधित आहे. काळ्या रंगांचे कपडे भेट देणे शुभ मानले जात नाही. यामुळे जीवनामध्ये कलह आणि तणाव वाढू शकतो.
चाकू, तलवारी, कात्री इत्यादींसारख्या तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून कधीही देऊ नये. असे मानले जाते की, या गोष्टी भेट म्हणून दिल्यास नातेसंबंधात त्रास होऊ शकतो. या वस्तू कितीही मौल्यवान किंवा सुंदर असल्या तरी, त्या भेटवस्तू दिल्याने तुमच्या नात्यात अंतर निर्माण होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे वेळेचे प्रतिनिधित्व करते ते भेट म्हणून दिल्यास जीवनात अडथळे येऊ शकतात. तर पर्स हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. ते भेटवस्तू दिल्याने पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून, या दोन्ही गोष्टींपासून अंतर ठेवून भेटवस्तू निवडणे चांगले.
रुमाल हेदेखील नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. ते भेट म्हणून दिल्यास दुःख आणि गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चप्पल आणि बूट घाणेरडेपणा आणि नीचपणाचे प्रतीक आहेत. भेट म्हणून दिल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.
असे मानले जाते की, देवी देवतांच्या मूर्त्या भेट म्हणून देणे चांगले मानले जात नाही. जर प्राप्तकर्ता त्यांना योग्यरित्या हाताळू शकत नसेल तर ते अपमानाचे कारण बनू शकते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा देखील पसरू शकते.
धार्मिक विचारसरणीने प्रेरित होऊन महाभारत, रामायण यांसारखी पुस्तके लोक भेट म्हणून देतात. पण वास्तूशास्त्रात या गोष्टी भेट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, या पुस्तकामुळे घरात भांडणे आणि वाद होऊ शकतात.
जर तुम्हाला एखाद्याला भेटवस्तू द्यायची असल्यास फुले, मिठाई, सामान्य थीमवर आधारित पुस्तके किंवा सजावटीच्या वस्तू निवडू शकता. हे केवळ सुंदर दिसत नाहीत तर शुभ ऊर्जा देखील प्रसारित करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)