Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कासव ठेवण्याचे नियम सांगण्यात आलेले आहे. घरात योग्य दिशेला कासव ठेवल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारू शकते. घरात कोणत्या दिशेला कासव ठेवायचा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 28, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • घरामध्ये कासव ठेवताना नियमांचे करा पालन
  • घरामध्ये कासव ठेवल्याने होणारे फायदे
  • घरामध्ये कासव ठेवण्याचे वास्तुचे नियम
 

हिंदू परंपरेमध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहे. यामध्ये एक आहे धातूचा कासव. काही लोक आपल्या घरात, दुकानात आणि बॅगेत कासवाची मूर्ती ठेवतात. असे मानले जाते की, यामुळे आर्थिक समस्या दूर होते, करिअरमध्ये प्रगती होते आणि धन आकर्षित होते. कोणत्या प्रकारचे कासव घरी आणणे फायदेशीर आहे आणि घरात कोणत्या दिशेला ठेवावा ते जाणून घ्या

यावेळी घरी आणा कासवाची मूर्ती

धातूची कासवाची मूर्ती कोणत्याही वेळी घरी आणू नये. वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती पौर्णिमेच्या दिवशी घरी आणणे सर्वांत चांगले मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, कासवाची मूर्ती काही वेळ दुधात भिजवून ठेवावी. दुधात भिजवल्यानंतर ती अभिजित मुहूर्तावर बाहेर काढावी. तो दिवस सर्वांत शुभ मानला जातो. मग ती स्वच्छ करून त्याची स्थापना करावी.

Vastu Tips: एंजल फिश की कपूरा? घरात कोणत्या माशांचे पेटिंग लावणे फायदेशीर

या दिशेकडे ठेवा लक्ष

कासव एक जलप्राणी आहे. यामुळे एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये धातूचा कासव ठेवा. हे भांड घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवावे. त्यानंतर ॐ श्रीं कुर्मय नमः या मंत्रांचा ११ वेळा जप करावा. कासवाचे डोक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असावे. उत्तर पर्व व्यक्तिरिक्त उत्तर दिशेला देखील तुम्ही कासव ठेवू शकता. कारण ही दिशा लक्ष्मीची मानली जाते. कासवाला चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नका. ड्रॉईग रूममध्ये कासव ठेवणे सर्वांत चांगले मानले जाते.

कोणत्या धातूचा कासव असतो शुभ

खूप प्रकारचे धातू असतात. आर्थिक समस्येतून सुटका हवी असल्यास तुम्हाला घरामध्ये सोन्याची कासवाची मूर्ती ठेवायला हवी. तांब्याचा कासव विद्यार्थी आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांसाठी शुभ मानला जातो. घरातील भांडण दूर करणे, मनाला शांती मिळणे, आर्थिक समस्येतून सुटका आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी चांदीच्या कासवाची निवड करावी. असे मानले जाते की, पितळ्याच्या कासव नोकरी आणि व्यवसायासाठी शुभ मानला जातो.

Vastu Dosh Upay: तुमच्या घरात वाढतोय तणाव? वास्तुदोषांच्या या लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष

कासवाच्या भांड्यातील पाणी बदलत रहा

घरात वास्तुदोष असल्यास किंवा मानसिक ताण असल्यास घरामध्ये क्रिस्टलची कासवाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. प्रजननाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी घरामध्ये एक मोठ्या कासवावर छोट्या कासवाची मूर्ती असणे फायदेशीर आहे. जर एकत्र कुटुंबात राहायचे असल्यास एकावर एक तीन कासव असलेली मूर्ती ठेवावी. दरम्यान, कासवाला ठेवलेल्या भांड्यातील पाणी रोज किंवा दोन दिवसांतून एकदा बदलावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरात कासव ठेवणे शुभ मानले जाते का?

    Ans: होय, वास्तुशास्त्रानुसार कासव हे शुभ, स्थैर्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. योग्य ठिकाणी ठेवले तर सकारात्मक ऊर्जा वाढते.

  • Que: कासवाची दिशा चुकीची असल्यास काय होते?

    Ans: चुकीच्या दिशेमुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे अडचणी, ताणतणाव किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

  • Que: वास्तुशास्त्रानुसार कासवाचे महत्त्व काय आहे?

    Ans: कासव हे स्थैर्य, संरक्षण आणि यशाचे प्रतीक मानले जाते. योग्य ठिकाणी ठेवले तर जीवनात संतुलन आणि प्रगती येते.

Web Title: Vastu tips follow these rules when keeping a tortoise at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: हंस किंवा बदकांच्या जोडीचे चित्र का मानले जाते शुभ, नातेसंबंध आणि प्रेमावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या
1

Vastu Tips: हंस किंवा बदकांच्या जोडीचे चित्र का मानले जाते शुभ, नातेसंबंध आणि प्रेमावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.