फोटो सौजन्य- pinterest
आपण अनेकदा जवळच्या व्यक्तींना एखाद्या खास प्रसंगी वस्तू भेट म्हणून देतो. कपडे, मिठाई तर कधी घड्याळ अशा दीर्घकाळ लक्षात राहणाऱ्या गोष्टी आपण भेट म्हणून देतो. घड्याळ ही वेळेचे प्रतीक असलेली एक गोष्ट आहे. मात्र वास्तू आणि ज्यातिषशास्त्रात उल्लेख केल्यानुसार प्रत्येक वस्तू भेट म्हणून देणे योग्य नाही. अन्यथा काही गोष्टींचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. या गोष्टींपैकी एक म्हणजे घड्याळ होय. घड्याळ भेट म्हणून कधी कोणाला द्यावे आणि कोणाला देणे टाळावे, जाणून घ्या
असे म्हटले जाते की, घड्याळ भेट दिल्याने एखाद्याची वेळ बदलली जाऊ शकते. जर तुम्ही अशा लोकांना घड्याळ दिल्यास त्यांचा वेळ चांगला जात नाही तर तुमच्या वेळेवर देखील परिणाम होतो. याचा अर्थ असा होतो की, यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीला घड्याळ भेट दिल्यास सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतात. पण घड्याळ भेट देताना काळजीपूर्वक विचार करुन द्या.
घड्याळ हे फक्त दाखवण्याचे उपकरण नसून ते सतत फिरत राहते याचाच अर्थ ते काळाचा प्रवाह दाखवते. असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीला घड्याळ भेट दिसल्यास त्याच्यासोबत जीवनाची गती आणि वेळेची दिशा ही जोडली जाते.
ज्यावेळी तुम्ही चांगल्या वेळेतून जात असाल म्हणजे तुमचे चांगले काम चालत असेल त्यावेळी घड्याळ भेट म्हणून देणे हानिकारक ठरु शकते. तसेच तुमच्या जीवनातील प्रगती थांबू शकते. काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
जर एखादी व्यक्ती आधीपासूनच अडचणीत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला घड्याळ भेट दिल्यास तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
वास्तुशास्त्रात म्हटल्यानुसार, वारंवार थांबणारे किंवा चुकीची वेळ दाखवणारे घड्याळ नकारात्मकता पसरवते.
घड्याळ कधी आणि कसे भेट द्यावे
जर एखाद्याला घड्याळ भेट म्हणून द्यायचे असेल तर हातावरचे घड्याळ न देता भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून द्या. तसेच हे घड्याळ एखाद्या मंदिरामध्ये, धार्मिक स्थळ किंवा गरजू व्यक्तीला दान केल्यास तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)