फोटो सौजन्य- pinterest
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीमधील अतूट विश्वासाचे प्रतीक असणारा सण. हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षक दोरा म्हणजेच राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणींचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतो.
रक्षाबंधनाचा हा पवित्र सण भावनांच्या दृष्टिकोनानेच नाही तर शुभ मुहूर्त आणि पंचांगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. यावेळी रक्षाबंधनाचा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र या दिवशी भद्रा काळ देखील आहे. अशा वेळी रक्षाबंधनाबाबात लोकांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी नेमकी राखी कधी बांधावी, जाणून घ्या
पंचांगानुसार, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त भद्रा संपल्यावरच सुरु होणार आहे. यावेळी कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. यावेळी ऑगस्ट महिन्यामध्ये भद्रा काळाचा कालावधी 1, 5, 8, 11, 15, 18, 21, 27 आणि 30 या दिवशी आहे. अशा वेळी भद्रा काळाची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरु होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री 1.52 वाजता संपेल.
भद्रा काळ रात्री संपत असल्यामुळे राखी बांधण्यासाठी शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधू शकता. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा नसेल. बहिणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही आपल्या भावांना राखी बांधू शकतात.
यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी नवपंचम, सौभाग्य, सर्वार्थ सिद्धी, प्रतियुती, बुधादित्य हे राजयोग तयार होत आहे. अशा वेळी काही राशीच्या लोकांना अनेक फायदे होणार आहे.
राखी बांधण्यापूर्वी भावाला ओवाळून घ्यावे. राखी बांधून झाल्यानंतर दोघांनी एकमेंकाना गोड खाऊ घालावेत. राखी बांधताना शक्यतो ओम येन बधो बली राजा, दानवेंद्रो महाबलः या मंत्रांचा जप करावा. राखी बांधताना भावांनी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवावी.
रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नाते. रक्षाबंधनात या दोन भावना खोलवर जोडल्या जातात. राखी ही केवळ एक रेशमी धागा नाही, तर ती दोन हृदयांना जोडणारी विश्वासाची दोरी आहे. ज्यावेळी बहीण राखी बांधते त्यावेळी ती तिच्या भावाच्या आरोग्यासाठी, यशासाठी आणि सर्व संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे भाऊ असेही वचन देतो की, तो नेहमी तिच्यापाठीशी उभा असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)