फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला काही ना काही अडचण असतेच. सोमवारची सकाळ असो किंवा मासिक बैठक, प्रत्येक ऑफिस कर्मचाऱ्याला एकच गोष्ट हवी असते, चांगला पगार, कामाची प्रशंसा आणि करिअरमध्ये जलद वाढ. मात्र कठोर मेहनत घेणे किंवा वेळेवर काम पूर्ण करणे एवढेच पुरेसे असते का? फेंगशुईमध्ये म्हटल्यानुसार, ऑफिसच्या डेस्कवर काही गोष्टी ठेवल्याने त्याचा परिणाम आपल्या मूडवर आणि उर्जेवर होत नाही तर आपले सहकारी आणि वरिष्ठांवर होतो, असे म्हटले आहे. जर तुम्ही ऑफिसच्या डेस्कवर अशा काही गोष्टी ठेवल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. कोणत्या आहेत त्या गोष्टी, जाणून घ्या
ऑफिसच्या डेस्कवर क्रिस्टल ग्लोब ठेवणे खूप शुभ मानले जाते. क्रिस्टल ग्लोबला स्पष्टता, नवीन संधीचे प्रतीक मानले जाते. क्रिस्टल ग्लोब ठेवल्यामुळे करिअरमध्ये वाढ होणार आहे. तसेच तुमची निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढलेली राहील. सकाळी ऑफिसला आल्याबरोबर ऑफिस डेस्क स्वच्छ करुन ठेवा त्यामुळे तुमच्या भोवती कायम सकारात्मक ऊर्जा राहील.
चिनी नाणी आकाराने मध्यभागी चौकोनी छिद्र असतात. ते लाल धाग्यात एकमेकांना बांधलेले असतात. चिनी नाणी ठेवल्यास खूप शुभ मानले जाते. कार्यालयात चिनी नाण्यांचा वापर केल्याने सुख समृद्धी येते. त्यासोबत अधिकाऱ्यांसोबतचे संबंधही टिकून राहतात. जे लोक व्यवसायामध्ये आहेत त्या लोकांनी लाल रिबनमध्ये बांधून मुख्य गेट किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ही नाणी तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होऊ शकते.
घरामध्ये आपण मनी प्लांट ठेवले असतेच पण ऑफिसच्या डेस्कवर छोटा मनी प्लांट ठेवू शकता. ऑफिसच्या डेस्कवर छोटा मनी प्लांट ठेवल्याने तुमच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या संधी मिळतील. तसेच तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. जर तुम्ही मनी प्लांट ठेवल्यास ते कोमेजून जाऊ नये, सुकलेले रोप नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
फेंगशुई ड्रॅगनला धैर्य, शक्ती आणि यशाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. कामाच्या ठिकाणी ठेवलेल्या फेंगशुई ड्रॅगनमुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. तसेच तुम्हाला चांगल्या संधी देखील मिळतील. ऑफिसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्याच दिशेला ड्रॅगन ठेवावा. हे तुम्ही व्यवसाय असल्यास त्या ठिकाणी देखील ठेवू शकता. मात्र व्यवसायिकांनी ते पुर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. त्यामुळे व्यवसायिकांना नवीन उंची गाठण्यास यश मिळते.
फेंगशुईनुसार, लाफिंग बुद्धाला समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. आफिसच्या डेस्कवर तुम्ही ही मूर्ती ठेवल्याने तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा कायम राहते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्यास तुमची चांगली प्रगती होऊ शकते. त्यासोबतच तुमचा तणाव कमी होण्यास देखील तुम्हाला मदत होते. मात्र लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवताना त्यांचे तोंड नेहमी मुख्य प्रवेशद्वाराकडे असले पाहिजे, याची काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)