फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करत असतो. त्या दिवशी संक्रांतीचा सण साजरा केला जातो. आज बुधवार, 16 जुलै रोजी सूर्यदेव कर्क राशीमध्ये संक्रमण करणार आहे त्यामुळे आज कर्क संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या पवित्र दिवशी चंद्र देखील आपले नक्षत्र बदलत आहे. ज्यामुळे या दिवसाचे महत्तव वाढलेले राहील. पंचांगानुसार, चंद्राने आज सकाळी 5.46 वाजता पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. आता उद्या म्हणजे गुरुवार, 17 जुलै रोजी सकाळी 6.25 पर्यंत चंद्र उत्तरा भाद्रपद नक्षत्रात राहील.
ज्योतिषशास्त्रामध्ये उत्तरा भाद्रपद नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. जे 27 नक्षत्रांपैकी 26 व्या नक्षत्रांवर आहे. हे नक्षत्र मीन राशीत होत असल्याने त्यावर शनि देवाचे राज्य राहील. तर चंद्र ग्रह व्यक्तीच्या मनाशी आणि मानसिक स्थितीशी संबंधित असतो. कर्क संक्रांतीच्या दिवशी चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
चंद्राचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण वृषभ ही चंद्राची आवडती रास आहे. चंद्राच्या या बदलत्या हालचालीमुळे त्याचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या दूर करण्यास मदत होईल. व्यावसायिक जीवनात संतुलन राहील. तसेच या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले मतभेद संपतील अशी अपेक्षा आहे.
चंद्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी प्रत्येक बाबतीत चांगले राहणार आहे. कारण ग्रहांचा राजा सूर्य देखील कर्क राशीत संक्रमण करत असल्याने त्यांच्यासाठी आजचा दिवस अधिक शुभ राहणार आहे. तसेच चंद्राची आवडती रास कर्क असल्याने या लोकांना संक्रमणाचा नकारात्मक परिणामाला सामोरे जावे लागत नाही. तरुणांमधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायामध्ये असणाऱ्यांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभासाठी चांगला राहील.
वृषभ आणि कर्क राशीसोबतच धनु राशीच्या लोकांनाही कर्क संक्रांतीच्या दिवशी चंद्राच्या संक्रमणाचा फायदा होईल. हे लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत बाहेर फिरायला जावू शकतात. तसेच तरुणांना आपले व्यक्तिमत्व सुधारण्याच संधी मिळेल. या लोकांची समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली राहील. जे लोक नवीन कामाची सुरुवात करण्याच्या विचारात आहे त्यांचा आजचा दिवस अनुकूल असेल. त्याचसोबतच हे लोक जमीन, मालमत्ता खरेदी करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)