vatpournima 2024
आपल्या हिंदू धर्मात अनेक सणांचा समावेश पाहायला मिळतो. प्रत्येक सणाला स्वतःचे असे पारंपरिक महत्त्व असते. तसेच प्रत्येक सणामागे काही धार्मिक गूढ लपलेले असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. हा एक भारतीय सण असून हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी सुवासिनी महिला मनोभावनेने वडाच्या झाडाची पूजा करत असतात. यावेळी वादाच्या झाडाची पूजा करून सात जन्माच्या फेऱ्या घेतल्या जातात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि हाच नवरा सात जन्म मिळवा या भावनेने वादाच्या झाडाची पूजा केली जाते.
अनेक महिला आठवड्याभरापासून या दिवसासाठी खास तयार करत असतात. तसेच या दिवशी महिलांद्वारे निर्जळी उपवासदेखील ठेवला जातो. या सणाला अनोखे पावित्र्य लाभलेले आहे. मात्र अजूनही अनेक महिला या दिवशी अनेक चुका करून बसतात, ज्या करणे खरे तर टाळायला हवे. याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या दिवशी कोणकोणत्या चुका करू नये याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत. यावर्षी वटपौर्णिमा 21 जून रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत याचा शुभमुहूर्त असणार आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झडाची पूजा का केली जाते?
धार्मिक कथेनुसार, या दिवशी देवी सावित्रीने यमराजापासून आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. याच दिवशी सावित्रीची पतिव्रता आणि पवित्रता पाहून यमराजाने पती सत्यवानाचे प्राण परत केले होते. तसेच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पतीला कधीही अकाली मरण प्राप्त होणार नाही आणि तो दीर्घायुष्य जगेल, असे वरदान यमराजद्वारे देण्यात आले होते. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका