फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला अनेक प्रकारे जबाबदार ग्रह म्हणून ओळखले जाते. शुक्र ग्रह हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय आणि लैंगिक इच्छा यांसाठी ओळखला जाणारा असा ग्रह आहे. हा ग्रह शुक्रवार, शुक्रवार, 13 जून रोजी रात्री 9.21 वाजता स्वतःच्या भरणी नक्षत्रात संक्रमण करणार आहे. शुक्र भरणी नक्षत्रामध्ये 26 जूनपर्यंत राहील त्यानंतर कृतिका नक्षत्रात प्रवेश करेल.
शुक्र ग्रह स्वतःच्या भरणी नक्षत्रात प्रवेश करत असल्याने त्याची शक्ती वाढण्याची शक्यता आहे. शुक्र ग्रहाच्या या संक्रमणाचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे या लोकांना काही विलासी वस्तू खरेदी करु शकतात. शुक्र ग्रहाचा या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा खूप फायदा होणार आहे. या लोकांना त्यांच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तसेच त्यांच्या नात्यांमध्ये गोडवा राहील. हे लोक कोणताही खर्च करताना मागे पुढे पाहणार नाही. तसेच तुम्ही कुटुंबामधील एखाद्या धार्मिक कार्यामध्ये देखील सहभाग घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही लेखन, गायन, वादन यांसारख्या गोष्टींमध्ये यश मिळवू शकता.
सिंह राशीच्या लोकांना या नक्षत्र संक्रमणाचा चांगला फायदा होणार आहे. या संक्रमणामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो. या राशीचे लोक कलेमध्ये चांगली प्रगती करु शकतात. त्याचबरोबर या लोकांना आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीची शक्यता आहे. हे लोक मनोरंजनामध्ये आपला वेळ घालवतील. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जायचा प्लॅन करु शकता. यावेळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. तुमची समाजामध्ये ओळख वाढू शकते.
या नक्षत्र संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांना खास राहील. या लोकांना आपल्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सिंह राशीचे लोक वस्तूंची खरेदी करु शकता. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादी भेटवस्तू देऊ शकता. तुम्ही कोणतीही एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.
शुक्र ग्रहांच्या नक्षत्र संक्रमणाचा परिणाम कुटुंबातील सुखसुविधांवर होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच कोणत्याही जुन्या आजारांपासून तुम्ही त्रस्त असाल तर त्यातून आराम मिळू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)