फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांमध्ये होणाऱ्या हालचालींचा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालींमुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ अशुभ प्रभाव पडणार आहे. तर काही राशीच्या लोकांना चढ उतारांचा सामना करावा लागणार आहे. तर काही राशीच्या लोकांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळणार आहेत. या आठवड्यामध्ये नवरात्रीचा उत्सव देखील साजरा केला जातो. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आहे. या आठवड्यात करिअर, आरोग्य किंवा नातेसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यामध्ये तुम्हाला करिअर आणि व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. तसेच कामाचा ताण आणि आव्हाने वाढू शकतात. त्यासोबतच आर्थिक व्यवहारांकडे विशेष लक्ष द्या आणि काळजीपूर्वक वाहन चालवा.
वृषभ राशीच्या लोकांचा हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात चढ-उतार जाणवू शकतात. तसेच या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चामध्ये वाढ देखील होईल. कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध राखण्यासाठी संवाद कायम ठेवा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात चांगल्या संधी मिळतील. तसेच तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील. वैवाहिक जीवन चांगले राहतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला या आठवड्यात कुठूनतरी फायदा होऊ शकतो. तुम्ही व्यवसायासंदर्भात नवीन योजना आखू शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यामध्ये करिअर आणि वैयक्तिक जीवनात सावधगिरी बाळगली पाहिजे. घाईघाईने किंवा चुकीचे निर्णय घेणे टाळा. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, अनावश्यक खर्च करणे टाळा.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यात तुम्हाला बाजारातील मंदी आणि स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. नात्यांमध्ये संघर्ष करण्यापेक्षा संवादावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. या आठवड्यात आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. या काळात तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील.
धनु राशीच्या लोकांचा हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात आर्थिक अडचणी असलेल्यांना भाग्य आणि पाठिंबा मिळेल. जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. तसेच तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. वादविवाद आणि प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.
कुंभ राशीच्या लोकांचा हा आठवडा उत्साहाचा राहील. या आठवड्यात घाई करणे टाळावे. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा कायम टिकून राहील. आर्थिक व्यवहारात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. संपत्ती, प्रेम आणि करिअरमध्ये प्रगती होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंद राहील. या आठवड्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक व्यवहार करताना सावधिगिरी बाळगावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)