
फोटो सौजन्य - Social Media
व्यासांनी जय नावाच्या महाकाव्याचे लेखन केले. (what is the relation of Vyas and Kauravas) याच महाकाव्यात शेकडो श्लोकांचा संदर्भ आहे ज्याला आपण महाभारत या नावाने ओळखतो. तेव्हा मौखिक कथन करण्याची परंपरा होती. कदाचित, व्यासांनी त्यांच्या शिष्यांना याचे कथन केले आणि पुढे त्यांच्याच शिष्यांपैकी कुणी तरी त्याचे लिखित प्रमाण सादर केले पण या विशाल कथेची परंपरेचे जनक स्वतःच व्यासच!
महाभारताचे कथन करणारे व्यास स्वतः महाभारत काळी उपस्थित होते अगदी कौरव आणि पांडवांच्या जन्मांच्या अगोदर पासून महाभारतात त्यांचे अस्तित्व आहे. व्यास हे कौरव आणि पांडवांचे आजोबा! तर पांडू आणि धृतराष्ट्राचा वडील! पण याची कथा फार आधीच सुरु होते. भीष्म ८ शापित वसुंपैकी एक! राजा शंतनू आणि गंगा यांना पुत्रप्राप्तीमध्ये भीष्म झाले पण दिलेल्या शब्दानुसार पुत्रप्राप्ती होताच गंगा त्यांना मारून टाकायची पण शेवटचा वसू उरला कारण शंतनूने त्याला वाचवले आणि गंगाचा शब्द मोडला गेला. त्यामुळे ती त्याला सोडून गेली. भीष्माचे उत्तम रित्या संगोपन करण्यात आले पण राजा तर एकटा पडला होता. पुढे त्याला सत्यवती नावाच्या स्त्रीवर प्रेम जडले. आपले पालन पोषण करणारा राज्याचे एकटेपणा भीष्माला पाहवत नव्हता त्यामुळे त्याने राजाला सत्यवतीशी विवाह करण्यास सांगितला त्यात सत्यवतीने तिला होणारच पुत्र राजा बनेल अशी अट ठेवली. भीष्मणे तिला विश्वास बसावा म्हणून ब्रह्मचर्य स्वीकारले.
सत्यवतीशी राजाचा विवाह झाला. त्यांना चित्रगंध आणि विचित्रवीर्य नावाचा पुत्र झला. चित्रगंध त्याच्या अहनकारामुळे गंधर्वाच्या हाती मारला गेला. तर नंतर विचित्रवीर्यही ऐन तारुण्यात मृत्यू मुखी पडला. भीष्म ब्रह्मचारी होती कुरुवंशाला वारस नव्हता तेव्हा सत्यवतीला पराशर ऋषींकडून विवाहाच्या आधी प्राप्त झालेला पुत्र व्यास, आईच्या सांगण्यावरून राज्यात आला. त्याला विचित्रवीर्याच्या पहिली पत्नी अंबालिकेकडून पांडू नावाचा पुत्र झाला तर विचित्रवीर्याच्या दुसऱ्या पत्नीकडून अंबिकेकडून धृतराष्ट्राचा नावाचा पुत्र झाला. हा धृतराष्ट्राचं कौरवांचा बाप! या नात्याने व्यास हे कौरवांचे पितामह झाले.