फोटो सौजन्य- pinterest
भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता. दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरवाची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते. तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील तो पूजनीय आहे. ग्रहांच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी देखील कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरवाच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाली मृत्युचे भय कमी होते. रोग आणि दोष देखील दूर होतात. जाणून घ्या कालभैरव जयंती कधी आहे, पूजेसाठी मुहूर्त
पंचांगानुसार, काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीची सुरुवात मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 11.8 वाजता सुरु होणार आहे. ही तिथी 12 नोव्हेंबर रोजी रात्री 10:58 पर्यंत असणार आहे. अशा वेळी कालभैरव जयंती बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
तसेच या दिवशी दोन शुभ योग देखील तयार होत आहे. कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्म योग तयार होणार आहेत. शुक्ल योगाची सुरुवात सकाळी होऊन तो 8.2 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ब्रम्हयोग सुरु होणार आहे. जो संपूर्ण रात्रभर राहील. त्यासोबतच त्या दिवशी आश्लेषा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी 6.35 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, मघ नक्षत्राची सुरुवात होईल.
ज्योतिषसास्त्रानुसार या काळामध्ये तुम्ही कालभैरवाची दिवसा पूजा करु शकता. पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6.41 ते 9.23 पर्यंत आहे, तर 10.44 ते दुपारी 12.5 हा देखील पूजेसाठी शुभ वेळ राहील. काल भैरव जयंतीला निशिता पूजा महत्त्वपूर्ण आहे, जिथे तंत्र आणि मंत्र पद्धती केल्या जातात. काल भैरव जयंतीचा निशिता मुहूर्त रात्री 11:39 ते 12:32 पर्यंत राहील.
कालभैरव जयंतीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.56 ते 5.49 पर्यंत राहील. त्या दिवशी अभिजित नसेल. यावेळी राहूकाळ दुपारी 12.5 ते 1.26 पर्यंत असेल.
स्कंद पुराणानुसार, ब्रह्मदेव एकदा गर्विष्ठ झाले आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवाचा अपमान केला. यामुळे त्यांना राग आला आणि त्यांचे चौथे डोके जळून गेले. त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली. शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले.
यामुळे, त्याच्यावर ब्रह्महत्येच्या पापाचा आरोप करण्यात आला होता. या पापापासून मुक्त होण्यासाठी काळभैरव शिवनगरी काशीला गेला. तो ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला. त्यानंतर काळभैरव कायमचा काशीतच राहिला.
कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती, शत्रू आणि अडथळे दूर होतात. याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू-केतू किंवा शनि दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. तंत्र आणि मंत्र पद्धतींसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कालभैरव जयंती बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी अष्टमी तिथीला आहे.
Ans: कालभैरव जयंतीच्या दिवशी निशा काळामध्ये पूजा केली जाणार आहे
Ans: कालभैरव हे भगवान शिवाचे भयंकर रुप आहे. या दिवशी पूजा केल्याने अडथळे दूर होतात असे म्हटले जाते.






