फोटो सौजन्य- pinterest
धर्मामध्ये सणांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक म्हणजे मासिक शिवरात्र. ही तिथी देवतांच्या देवता महादेवाला समर्पित आहे. ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यावेळी ही तिथी आज गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी अनेक शुभ योग देखील तयार होत आहे. त्यामुळे या तिथीचे महत्त्व देखील आणखी वाढत आहे. मान्यतेनुसार, या दिवशी जो भक्त उपवास करतो त्याला चांगले फायदे होतात. त्यासोबत सर्व कामे वेळेवर होऊ लागतात. मासिक शिवरात्रीला कोणते शुभ योग आहेत आणि महत्त्व काय आहे ते जाणून घ्या
पंचांगानुसार, त्रयोदशी तिथीची सुरुवात दुपारी 12:44 वाजता होत आहे. या दिवशी चंद्र स्वतःच्या राशीत संक्रमण करेल. गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग या शुभ योगांची सुरुवात पहाटे 5.54 ते 12.8 पर्यंत असेल. तर या दिवशी सूर्योद्य सकाळी पहाटे 5.53 वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी 6.54 वाजता होईल.
मासिक शिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे. पुष्य नक्षत्रामुळे गुरु-पुष्य योग धन, समृद्धी आणि बुद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या योगामध्ये केलेले कार्यामुळे अपेक्षित यश मिळते. त्यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. हा योग सर्व कार्यांच्या यशासाठी ओळखला जातो. तसेच नवीन कामाची सुरुवात करणे, गुंतवणूक करणे किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे यासाठी हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. अमृत सिद्धी योग आध्यात्मिक आणि सांसारिक कार्यात यश प्रदान करण्यासाठी योग्य मानला जातो.
शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सकाळी आवरुन झाल्यावर चांगले कपडे परिधान करावे. नंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी, दूध, तूप, मध आणि साखर अर्पण करुन अभिषेक करावा. बिल्वपत्र, धतूरा, भांग आणि पांढरी फुले अर्पण करा आणि काळे तीळ, पवित्र धागा, सुपारी, बार्ली, गहू, गूळ, अबीर बुक्का आणि इतर पूजा साहित्य देखील अर्पण करावे. विधिवत पूजा झाल्यानंतर ध्यान करा आणि ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा. शिव चालीसा किंवा रुद्राष्टक पठण करा. पूजा झाल्यानंतर आरती करुन पूजेची समाप्ती करा.
मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी शिवभक्त उपवास ठेवतात आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांची विशेष पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच भक्ताने मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने मंगळ दोष, पितृ दोष आणि ग्रहांचे अशुभ परिणाम कमी होण्यास मदत होते. त्यासोबत जीवनात सुरु असलेल्या समस्या कर्ज, आजार आणि मानसिक त्रास देखील दूर होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)