फोटो सौजन्य- pinterest
गणेश चतुर्थीच्या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी सार्वजनिक मित्रमंडळ मोठे मंडप उभारतात. असे मानले जाते की, यावेळी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. म्हणून गणेश चतुर्थीला भक्त गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्याची स्थापना करतात. मात्र मूर्तीची खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केल्याने शुभ परिणाम मिळतात. त्यासोबत जीवनात नेहमी सुख समृद्धी राहते.
गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी घरामध्ये मूर्ती आणताना ती खूप लहान किंवा मोठी नसावी. म्हणजेच बाप्पाची मध्यम मूर्ती आणणे खूप शुभ मानले जाते. मंडळामध्ये मोठ्या आकाराच्या मूर्तीची स्थापना केली जाऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना त्याच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. घरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यासाठी डाव्या सोडांची मूर्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरासाठी मूर्ती खरेदी करताना ती अशी करा की तिची सोंड डाव्या बाजूला वाकलेली असेल. कारण ही दिशा यश आणि समृद्धीची असल्याचे मानले जाते. तर उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशाची मूर्ती म्हणजे पूजा करण्यासाठी कठोर नियम असणे, असे मानले जाते. शक्यतो अशा प्रकारची मूर्ती मंदिरामध्ये ठेवली जाते.
यावेळी आपल्याला गणपती बाप्पाच्या अनेक मूर्ती बघायला मिळतात. ज्यामध्ये गणपती उभे, नाचताना किंवा विश्रांतीच्या स्थितीत दिसतात. मात्र घरी आणताना ते बसलेल्या स्थितीत असणारी मूर्ती आणणे शुभ मानले जाते. कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. परंतु मंडपामध्ये उभी असलेली मूर्ती, नृत्य करून इत्यादी आसनांमध्ये स्थापित असलेल्या मूर्तीची स्थापना करता येते.
गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतो. तर उंदीर हे त्याचे वाहन आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना मूर्तीसोबत मोदक आणि उंदीर असणे आवश्यक मानले जाते. या प्रकारची मूर्ती घरी आणणे खूप चांगले मानले जाते.
गणपतीची मूर्ती खरेदी करताना तिच्या रंगाकडे लक्ष दिले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार, घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणणे सर्वात शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणल्याने सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते. पांढऱ्या रंगांच्या मूर्तीसोबत सिंदूर रंगांची मूर्ती देखील करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविकास होतो. तसेच गणपतीची मूर्ती चतुर्थीच्या आधी शुभ मुहूर्तावर घरी आणावी त्यामुळे शुभ फळ मिळतात, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)