Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu Religion: आरतीची थाळी गोलच का फिरवावी, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

Hindu Religion: देवाची आरती करताना ताट नेहमी गोलाकार आणि घड्याळाच्या दिशेनेच का फिरवले जाते? आरतीचे ताट सरळ न ठेवता गोल फिरवण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक मान्यता आहेत. जाणून घेऊया आरतीच्या या पद्धतीमागील महत्त्व आणि त्यामागील श्रद्धा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 16, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • आरतीचे ताट गोलाकार फिरवणे हे देवतेला प्रतीकात्मक प्रदक्षिणा घालण्याचे प्रतीक मानले जाते.
  • आरतीतील दिव्याची ज्योत अंधार दूर करून ज्ञान आणि प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देते.
  • आरतीच्या माध्यमातून भक्त देवाप्रती आपली श्रद्धा, भक्ती आणि समर्पण व्यक्त करतो.

आपल्या घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवाची आरती केली जाते. सण-उत्सव, पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्येही आरतीला विशेष महत्त्व असते. मात्र, आरती करताना एक गोष्ट नेहमी सारखी दिसते. देवासमोर आरतीचे ताट गोलाकार फिरवले जाते. ते सरळ धरून किंवा एकाच जागी ठेवून आरती का केली जात नाही, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? धार्मिक परंपरेनुसार आरतीच्या या गोलाकार हालचालीमागे प्रदक्षिणा, समर्पण, भक्ती आणि दैवी ऊर्जेचे प्रतीकात्मक अर्थ दडलेले आहेत.

आपण जेव्हा ओवाळतो किंवा आरती करतो तेव्हा आरतीची थाळी ही नेहमी गोल फिरवतो पण कधी विचार केलाय का? आरतीच ताट किंवा ताम्हण सरळ ठेवून का आरती करत नाही. आरतीची थाळी ही देवांसमोर प्रदक्षणेनुसार म्हणजे घड्याळाच्या काटेच्या दिशेने गोल फिरवण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.

Navpancham Yog: सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे शनीसोबत नवपंचम योग; या राशींच्या जीवनात होणार सकारात्मक बदल

आरतीचे ताट गोलाकार फिरवण्यामागील धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मामध्ये जसं मंदिरामध्ये देवाची प्रदक्षणा घातली तसंच आरतीची थाळी गोल फिरवणं हे देवाभोवती प्रदक्षणा घालण्याचं एक रुप मानलं जातं. शिवपुराणानुसार घड्याळाच्या दिशेने केलेली प्रदक्षणा ही वैश्विक समतोल आणि पावित्र्य दर्शवते म्हणजेच आरती ही प्रदक्षणाचं प्रतीक मानलं जातं. आरतीची ज्योत गोल फिरवल्यामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

वैज्ञानिक आणि अध्यात्मिक श्रद्धा

वैज्ञानिक आणि अध्यात्मिक मान्यतेनुसार पृथ्वी ज्या दिशेने फिरते त्याच दिशेने दिवा फिरवल्यास वातावरणातील लहरींशी सुसंवाद साधणं सोपं होतं. यामुळे सकारात्मक ऊर्जा राखण्यास मदत मिळते. हिंदू परंपरेनुसार, आरतीची थाळी देवांच्या चरणांपासून डोक्यापर्यंत म्हणजेच अनाहतेचक्रापर्यंत विशिष्ट पद्धतीने गोल फिरवली जाते. ज्यामुळे देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी आणि दिव्याच्या ऊर्जा भक्ताभोवती संरक्षक कवच तयार करतात, असं मानलं जातं.

याशिवाय आरतीचं ताट गोल फिरवताना आपण देवाकडे पूर्ण समर्पित होतो आणि आपल्यातील अहंकार नष्ट होऊन दैवी प्रकाशाचे वलय निर्माण होते, अशी यामागे श्रद्धा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरतीचे ताट गोलाकार का फिरवले जाते?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, आरतीचे ताट गोलाकार फिरवणे हे देवतेला प्रदक्षिणा घालण्याचे प्रतीक मानले जाते.

  • Que: आरतीचे ताट घड्याळाच्या दिशेनेच का फिरवतात?

    Ans: हिंदू परंपरेत देवाला उजव्या बाजूला ठेवून प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. त्याच परंपरेनुसार आरतीचे ताट घड्याळाच्या दिशेने फिरवले जाते.

  • Que: आरतीच्या गोलाकार हालचालीचा आध्यात्मिक अर्थ काय आहे?

    Ans: वर्तुळ हे पूर्णत्व आणि अनंततेचे प्रतीक मानले जाते. आरतीच्या माध्यमातून भक्त देवाशी आपले नाते आणि समर्पण व्यक्त करतो.

Web Title: Why aarti thali is rotated religious significance pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Navpancham Yog: सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे शनीसोबत नवपंचम योग; या राशींच्या जीवनात होणार सकारात्मक बदल
1

Navpancham Yog: सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे शनीसोबत नवपंचम योग; या राशींच्या जीवनात होणार सकारात्मक बदल

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Hindu Religion: भारतीयांना समुद्रप्रवासाची बंदी का होती? जाणून घ्या सिंधुबंदीमागील धार्मिक आणि सामाजिक कारणे
4

Hindu Religion: भारतीयांना समुद्रप्रवासाची बंदी का होती? जाणून घ्या सिंधुबंदीमागील धार्मिक आणि सामाजिक कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.