Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणामध्ये मंगळागौरीचे व्रत का ठेवले जाते? जाणून घ्या महत्त्व

श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये श्रावणातील सोमवारप्रमाणेच मंगळवारचेही विशेष महत्त्व आहे. सोमवार, 5 ऑगस्टरपासून श्रावण महिना सुरु झाला असून, आज 6 ऑगस्ट रोजी मंगळागौरीचे व्रत केले जाणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य- झी मराठी

फोटो सौजन्य- झी मराठी

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये श्रावणातील सोमवारप्रमाणेच मंगळवारचेही विशेष महत्त्व आहे. सोमवारी श्रावण सोमवारचे व्रत पाळतात, तर महिला दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात.

हेदेखील वाचा- राहुचा प्रकोप झालाय तर चांदीच्या ग्लासातून प्या पाणी, आरोग्य आणि नशीब दोन्ही चमकेल

श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये पवित्र महिना मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. शिव भक्त दर सोमवारी श्रावण सोमवार व्रत पाळतात, तर महिला दर मंगळवारी मंगळा गौरीचे व्रत करतात. असे मानले जाते की, माता पार्वतीने महादेवाला मिळविण्यासाठी असंख्य उपवास केले होते आणि त्यापैकी एक म्हणजे मंगळागौरी व्रत. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होतात. जर भक्ताची अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत केल्याने त्याची मनोकामनाही पूर्ण होते. यंदा श्रावण महिन्यातले पहिले मंगळा गौरी व्रत आज 6 ऑगस्ट रोजी तर शेवटचे मंगळा गौरी व्रत 3 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. श्रावणातील मंगळागौरीचे महत्त्व जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, मंत्र

मंगळागौरीचे महत्त्व

नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले ‘सौभाग्य व्रत’ म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते. मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे आयुष्य दीर्घ होते. अविवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठीही पाळले जाते. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते.

मंगळागौरीचे पूजन कसे करावे

अन्नपूर्णा देवीची मूर्ती नवविवाहितेच्या हस्ते चौरंगावर स्थापन करावी.

त्यानंतर गणेश पूजन, कलश-घंटा-दीप पूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचे आवाहन करावे.

नंतर देवीच्या पूजेसाठी बुक्का, अक्षता, 5 खारका, 5 सुपार्‍या, 5 बदाम, 4 खोबर्‍याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री, दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, एक नारळ, कापड, हळदकुंकू लागते.

मूर्तीची विधीवत पूजा करावी. देवीला कणेकचे अलंकार अर्पण करा. नंतर विविध पत्री, फुले वाहावीत.

नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इ. धान्ये मूठीने अर्पण करावीत. धूप-दीप-नैवेद्य अर्पण करावा. षोडशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला तीन अर्घ्य द्यावीत.

त्यानंतर यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी. देवीला विविध पक्क्वान्नांनी युक्त महानैवेद्य अर्पण करावा. पूजेनंतर सुवासिनीना भोजन केले जाते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. तसेच सुवासिनीला वाण देऊन पारंपारिक खेळ खेळून जागरण करावे.

 

Web Title: Why do women keep mangla gauri vrat in shravan know the importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • dharm

संबंधित बातम्या

Zodiac Sign: महादेवांच्या आशीर्वाद आणि रवी योगामुळे मकर राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल सुख समृद्धी
1

Zodiac Sign: महादेवांच्या आशीर्वाद आणि रवी योगामुळे मकर राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल सुख समृद्धी

Numberlogy: बुधाच्या संक्रमणामुळे या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: बुधाच्या संक्रमणामुळे या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या
3

Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

Kendra Drishti Yog: बुध-शनि केंद्र दृष्टि योगामुळे बदलणार या राशीच्या लोकांचे नशीब
4

Kendra Drishti Yog: बुध-शनि केंद्र दृष्टि योगामुळे बदलणार या राशीच्या लोकांचे नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.