Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवारीच का केली जाते शिवशंकराची पूजा? जाणून घ्या पौराणिक कथा

महादेवांची पूजा करण्यासाठी सोमवारचा दिवस उत्तम मानला जातो. कारण सोमवार चंद्राशी संबंधित आहे. हा दिवस शंकराच्या उपासनेसाठी आहे. या दिवशी पूजा करण्यामागे काही पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 04, 2026 | 02:26 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सोमवारीच का केली जाते शिवशंकराची पूजा
  • सोमवारी शिवशंकराची पूजा करण्यामागील पौराणिक कथा
  • सोमवारचा संबंध चंद्राशी आहे
 

 

शिवशंकराची आराधना करण्यासाठी सोमवार हा सर्वात उत्तम दिवस मानला जातो, कारण सोमवार चंद्राशी संबंधित आहे, जो शिवाच्या जटांमध्ये असतो. सोमवारव्यतिरिक्त प्रदोष व्रत, महाशिवरात्री या दिवसांत आणि काळातही शिवशंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला ‘प्रदोष’ म्हणतात. सायंकाळच्या या काळात (सूर्यास्तानंतर) शिवपूजा करणे अतिशय फलदायी असते.

आठवड्याच्या सात दिवसांमध्ये फक्त सोमवार हा दिवसच भगवान शंकराच्या उपासनेसाठी का समर्पित आहे? त्याचा अर्थ रहस्य या दिवसाच्या नावातच दडलेलं आहे. सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र, जो स्वतः भगवान शिवाच्या जटांमध्ये असतो. सोमचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे सौम्य स्वभावाचे मानले जातात.

तसेच आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो, तेव्हा त्याच ओम देखील येतो. सोमवारमध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिव शंभू हे स्वतः ओंकार आहेत, त्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो. या सर्व कारणांमुळे सोमवार हा शिव शंकराच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला आहे.

श्रावण महिना शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र

संपूर्ण श्रावण महिना शंकराची आराधना करण्यासाठी समर्पित आहे. विशेषतः श्रावणातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे. तसेच माघ वद्य चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री ही शिवाची सर्वात मोठी रात्र मानली जाते.

Dream Meaning: स्वप्नात स्वतःला पडताना पाहण्याचा अर्थ, काय सांगते स्वप्नशास्त्र

नित्य पूजा कशी करावी

शिवभक्त दररोज (नित्य) सकाळी आणि संध्याकाळी ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करून शिवाची पूजा करू शकतात. सोमवारच्या पूजेचे महत्त्व आणि नियम म्हणजे चंद्रदोष आहे. पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने सोमवारी महादेवाची पूजा करून मुक्ती मिळवली होती, म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे.

पूजेची पद्धत

सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून, शिवलिंगाला दूध, मध, दही, तूप आणि गंगाजल अर्पण करावे. सोबतच बेलपत्र वाहून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा. पूजेदरम्यान पांढऱ्या रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. अनेकजण सोमवारी उपवास करून प्रदोषकाळात पूजा करतात आणि दिवसभर शिवाची आराधना करतात. सोमवारव्यतिरिक्त शनिवार (शनेश्वर आणि शिवपूजा) किंवा प्रदोषकाळ हे शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहेत.

Budh Shani Conjunction: बुध आणि शनि पुन्हा येणार एकत्र, 22 मेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

काय सांगते पौराणिक कथा

यामागे सनातन धर्माची पौराणिक कथाही आहे. कथेनुसार, या दिवशी चंद्रदेवाने महादेवाची पूजा केली होती आणि महादेवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवांना क्षयरोगापासून मुक्त केलं होतं. या कारणामुळे, सोमवार भोलेनाथच्या पूजेसाठी समर्पित आहे.

दुसऱ्या एका कथेत असं सांगण्यात आलं आहे की, माता पार्वतीने भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि 16 सोमवारचा उपवास देखील केला होता. यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. तेव्हापासून या दिवशी सोमवारचं व्रत पाळण्याची खूप श्रद्धा आहे.

सोमवारी भक्तिभावाने करा भगवान शंकराची पूजा

भगवान शंकराची सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी. सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोमवारी भगवान शिवाची पूजा का केली जाते?

    Ans: हिंदू परंपरेनुसार सोमवार हा दिवस भगवान शिव यांना समर्पित मानला जातो. या दिवशी शिवपूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात शांती मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: सोमवारी आणि चंद्रदेव यांचा काय संबंध आहे?

    Ans: सोम” म्हणजे चंद्र. पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाला शापातून मुक्त करण्यासाठी भगवान शिवांनी त्याला आपल्या जटांमध्ये स्थान दिले. त्यामुळे सोमवार हा शिवाशी संबंधित मानला जातो.

  • Que: सोमवारी उपवास का केला जातो?

    Ans: उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते, तसेच भक्तीभाव वाढतो. शिवाची कृपा मिळवण्यासाठी हा उपवास केला जातो.

Web Title: Why is shiva shankar worship performed only on monday mythological story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
2

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
4

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.