
आमंत्रण की निमंत्रण? अर्थामध्ये नेमका काय फरक? 99% लोकांना माहित नाही याचं खरं उत्तर
मराठी भाषा ही जितकी ऐकायला छान वाटते तितकीच ती उमजल्यावर बोलायला अजूनच छान वाटते. आपल्या भाषेत असे किती तरी निरनिराळे शब्द आहेत ज्याचे अर्थ लोकांनां एक सारखेच वाटतात पण नीट पाहिल्यावर समजते की यातील अर्थ एकमेकांपासून वेगळे आहे. आज आपण अशाच दोन शब्दातील फरक जाणून घेणार आहोत.
आम्ही तुम्हाला invite केले आहे. या वाक्यातील invite हा इंग्रजी शब्द आपण दिवसातून खूप वेळा ऐकतो. शब्दशः invite या इंग्रजी शब्दाला आपल्या मराठी भाषेत दोन पर्याय आहेत. हे दोन पर्याय म्हणजे आमंत्रण आणि निमंत्रण. आता तुम्ही म्हणाल हे दोन्ही शब्द वेगळे जरी असले तरी त्याचे अर्थ सेम टू सेम असेल ना. पण हीच तर खरी आपल्या भाषेची गमंत आहे. चला जाणून घेऊया आमंत्रण आणि निमंत्रण हे शब्द कधी आणि कोणत्या परिस्थितीत वापरले जातात आणि त्याचा अर्थ काय?
आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन्ही शब्द जरी कोणाला बोलावण्याचा प्रयोजनाने वापरले जात असले तरी त्यांच्यातील एकी छोटासा फरक दोन्ही शब्दांना एक वेगळा अर्थ देतो. जेव्हा एखाद्या कार्यक्रमात कोणी आले किंवा नाही आले तरी कार्यक्रम पार पाडणार हे सूचित करायचे असते तेव्हा मुख्यतः आमंत्रण हा शब्द वापरला जातो. तर दुसरीकडे, ठराविक व्यक्तीच्या उपस्थतिथीशिवाय एखादा कार्यक्रम पार पडू शकत नाही हे जेव्हा सूचीत करायचे असते तेव्हा निमंत्रण हा शब्द वापरला जातो.
आपल्या भाषेत आपल्याला असे कित्येक शब्द पाहायला मिळतील ज्यात हे असे भन्नाट अर्थ दडलेले आहे. जसे कि प्रख्यात आणि विख्यात किंवा एवढं आणि इतकं. यामुळेच तर हजारो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या माय मराठीचे गोडवे गाताना म्हंटले आहे, “माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।।”