Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Explainer : ना लढाऊ विमाने ना आधुनिक तंत्रज्ञान तरीही जगात डंका; पाकिस्तानला परवडेल का तालिबानसोबत पंगा?

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर आता १५००० तालिबानी सैनिक पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले आहेत. पाकिस्ताननेही पेशावर आणि क्वेटा येथून सीमेवर सैन्य पाठल्याचं वृत्त आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 27, 2024 | 09:28 PM
पाकिस्तानने अफगानिस्तानच्या सीमेवर सैन्य पाठवलं; तालिबानचीही जमावजमाव, कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता

पाकिस्तानने अफगानिस्तानच्या सीमेवर सैन्य पाठवलं; तालिबानचीही जमावजमाव, कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून तणापूर्ण वातावरण असून या तणावाने आता उग्र रुप धारण केलं आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर आता १५००० तालिबानी सैनिक पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाले आहेत. पाकिस्ताननेही पेशावर आणि क्वेटा येथून सीमेवर सैन्य पाठल्याचं वृत्त आहे. मात्र कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान आणि लढाऊ विमाने नसताना अमेरिकेला आणि रशियाला भारी पडलेल्या तालिबानसोबत पाकिस्तानला वैर कितपत परवडेल? संपूर्ण जगात डंका असलेल्या तालिबानचा नेमका कसा आहे इतिहास जाणून घेऊया…

Explainer : हिवाळ्यातच का वाढतो हवा प्रदूषणाचा धोका?; थंड हवेशी काय आहे

मीर अली सीमेवर वाढत्या हालचालींमुळे पाकिस्ताननेही आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. सीमावर्ती भागात सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या परिस्थितीमुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. तणाव वाढत असताना, पाकिस्तान आणि तालिबानमधील हा संघर्ष कोणत्या दिशेने पुढे सरकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तालिबानची ही आहे खरी ताकद

अफगाण तालिबानकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. AK-47, मोर्टार, रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे. याशिवाय तालिबानी सैनिक डोंगर आणि गुहांमध्ये लपून हल्ले करतात, ज्याची पाकिस्तानी लष्करालाही माहिती नसते. दरम्यान शेहबाज शरीफ सरकार आधीच आर्थिक संकटात आहे. CPEC प्रकल्पाला होणारा विलंब आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावाद यासारख्या समस्यांना पाकिस्तानाला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे सरकार आणि लष्कराची ताकद कमी झाली आहे. आता तालिबानसोबतच्या संघर्षामुळे हे संकट आणखी वाढलं आहे.

जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री ते पहिले शिख पंतप्रधान; डॉ. मनमोहन सिंग यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

तालिबानची रणनीती काय आहे?

तालिबानने हे दाखवून दिले आहे की ते कोणत्याही मोठ्या लष्करी शक्तीपुढे कोणत्याही परिस्थिती झुकणार नाहीत.  तालिबानने अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांना वर्षानुवर्षे आव्हान दिलं आणि शेवटी त्यांना अफगाणिस्तानातून परत जाण्यास भाग पाडलं. तालिबानला तोंड देण्याची लष्करी ताकद किंवा आर्थिक क्षमता पाकिस्तानकडे नाही.

अफगाणिस्तानातून रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर पाकिस्तानमध्ये तालिबानचा उदय झाला. पश्तो भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. विशेषत: ते विद्यार्थी जे कट्टर इस्लामिक धार्मिक शिकवणीने प्रेरित आहेत. कट्टरपंथी सुन्नी इस्लामिक विद्वानांनी धार्मिक संस्थांच्या मदतीने पाकिस्तानात याचा पाया घातला होता, असं मानलं जातं. तालिबानवर देववंडी विचारसरणीचा पूर्ण प्रभाव आहे. सौदी अरेबियाकडून येणारी आर्थिक मदत तालिबानला वाढवण्यास कारणीभूत मानली जात होती.

अमेरिकेने तब्बल १० वर्षांनंतर सैन्य माघार घेतल्यानंतर तालिबाने अफगाणिस्तानवर कब्जा केला.  सुरुवातीला तालिबानने जाहीर केले की इस्लामिक भागातून परकीय राजवट संपवणे आणि तेथे शरिया कायदा आणि इस्लामिक राज्य स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला सरंजामदारांचे अत्याचार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने तालिबानमधील मसीहा पाहिला आणि अनेक भागात आदिवासींनी त्यांचे स्वागत केलं.  पण नंतर धर्मांधतेमुळे तालिबानची लोकप्रियताही संपुष्टात आली पण तोपर्यंत तालिबानी संघटना इतकी शक्तिशाली बनली की महासत्तांचाही इथे निभाव लागत नाही.

अफगाण आणि तालिबानची किती आहे लष्करी ताकद?

तालिबान किती शक्तिशाली आहे की ते अफगाण सैन्यावर मात करत आहे? अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती सांगतात की, ‘तालिबानचा लवकरच खात्मा होईल. तालिबानकडे सुमारे 80 हजार सैनिक आहेत आणि अफगाण सैन्यात 5 ते 6 लाख सैनिक आहेत. याशिवाय अफगाणिस्तानकडे हवाई दल आहे जे तालिबानला पराभूत करेल. तथापि, या दाव्यानंतरही, तालिबान जमिनीवर किती मजबूत आहे, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आहेत.

अमेरिकेचा दावा खरा ठरला

तालिबानचं मुख्य मनुष्यबळ आदिवासी भागात स्थायिक झालेल्या जमाती आणि त्यांचे लढवय्ये आहेत. याशिवाय कट्टरतावादी धार्मिक संस्था आणि मदरसेही त्यांच्या कल्पनेला पाठिंबा देत आहेत. त्यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची गुप्त मदत तालिबानसाठी उपयोगी ठरत आहे, असल्याचा दावा करण्यात येत होता. अमेरिकन इंटेलिजन्सचे मूल्यमापन ग्राउंड परिस्थिती देखील स्पष्ट करते, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत अफगाण सरकारचं वर्चस्व संपेल आणि तालिबानी राजवट येऊ शतके, असा दावा करण्यात आला होता. त्याचा हा दावा काही क्षणात खरा ठरला आणि अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला. आता त्याच तालिबानसोबत पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवर तणावपूर्ण स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

Web Title: Afghan taliban marching towards pakistan border pak army peshawar queta soldiers move to afghanistan border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 05:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.