हिवाळ्यातच का वाढतो हवा प्रदूषणाचा धोका?; थंड हवेशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर
सप्टेंबरमध्ये पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये आर्द्रता असली तरी थंडीची चाहूल लागलेली असते. हिवाळ्याला सुरुवात होते आणि ही गुलाबी थंडी हवी हवीसी वाटायला लागते. मात्र हीच गुलाबी थंडी अलिकडे मोठ्या शहरांसाठी आणि औद्योगीक क्षेत्र असलेल्या ठिकाणी डोकेदुखी ठरत आहे. हिवाळ्यात या शहरांमध्ये हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यातून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी डोकंवर काढलं आहे. मात्र हिवाळ्यातच हवा प्रदूषणाचा धोका का वाढतो आणि थंड हवेचा आणि प्रदूषणाचा नेमका संबंध काय आहे, जाणून घेऊया या रिपोर्टमधून…
एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा दैनिक हवेच्या गुणवत्तेसाठी वापरला जातो. तुमच्या शहरातील, भागातील हवा किती शुद्ध किंवा प्रदूषित आहे आणि कोणते घटक आरोग्यावर परिणाम करू शकतात याची माहिती देते. AQI प्रदूषित हवेचा श्वास घेतल्यानंतर काही तासांत किंवा दिवसांत तुम्हाला जाणवू शकणाऱ्या आरोग्यावरील परिणामांवर लक्ष केंद्रित करते. EPA स्वच्छ वायु कायद्याद्वारे नियमन केलेल्या पाच प्रमुख वायु प्रदूषकांसाठी AQI ची गणना करते: भू-स्तर ओझोन, कण प्रदूषण (ज्याला पार्टिक्युलेट मॅटर देखील म्हणतात), कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. या प्रत्येक प्रदूषकासाठी, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी EPA ने राष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेची मानके स्थापित केली आहेत .जमिनीवरील ओझोन आणि हवेतील कण हे दोन प्रदूषक आहेत जे आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका निर्माण करतात.
SO2 अर्थात सल्फर ऑक्साईड, जो कोळसा आणि तेल जाळल्याने उत्सर्जित होतो. शहरांमध्ये हे दोन घटकांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. CO2 म्हणजेच कार्बन ऑक्साईड जो रंगीत असतो, तसंच त्याला गंध असून तो विषारी असतो. कोळसा किंवा लाकूड यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण जळण्याने हा वायू तयार होतो. वाहनांमधून होणारे उत्सर्जन कार्बन ऑक्साईडचे प्रमुख स्त्रोत आहे. NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, हा वायू उच्च तापमानातील ज्वलनातून तयार होतो. हा वायू हवेच्या खालच्या थरांमध्ये धुकं किंवा वर एक तपकिरी रंगाच्या रुपात असतो. NH3 हा कृषी उत्पादनांच्या प्रक्रियेतून उत्सर्जित होणारा अमोनिया आहे. कचरा, सांडपाणी आणि औद्योगिक प्रक्रियेतील दुर्गंधीतून हा वायू उत्सर्जित होतो. O3 म्हणजे ओझोन उत्सर्जन. हवेच्या प्रदूषणासाठी हे पाच प्रमुख घटक कारणीभूत ठरतात. अलिकडे मोठ्या प्रमाणात यांचं उत्सर्जन होत असून ते रोखणे आव्हानात्मक बनलं आहे.
देशाच एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर
PM म्हणजे पार्टीक्युलेट मॅटर. हे हवेतील सूक्ष्म कण आहेत. ज्याचा व्यास 10 मायक्रॉन (PM10) किंवा 2.5 मायक्रॉन (PM2.5) पर्यंत असू शकतो. PM 2.5 हा हवेत विरघळलेला एक अतिसुक्ष्म पदार्थ आहे. या कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम 2.5 ची पातळी ज्यावेळी जास्त असते तेव्हाच धुक्याचं प्रमाण वाढतं. दृश्यमानतेची पातळीही घसरते. PM2.5 अधिक धोकादायक आहे, कारण हे कण श्वसनमार्गाद्वारे थेट फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या आणि हृदयविकार यांचं प्रमाण वाढतं.
PM 10 ला पार्टिक्युलेट मॅटर (Particulate Matter) म्हणतात. या कणांचा आकार 10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचा आहे. त्यात धूळ आणि धातूचे सूक्ष्म कण समाविष्ट असतात. धूळ, बांधकाम आणि कचरा जाळण्यामुळे PM 10 आणि PM 2.5 अधिक वाढते.
हिवाळ्यात तापमान कमी असतं त्यामुळे हवेत दव असतं. त्यामुळे हवेचा धर जमिनीलगत असतो. अनेक औद्योगिक प्रकल्प, वाहने, बांधकाम प्रकल्पातून निर्माण होणार सूक्ष्म कण, धूळ या हवेत मिसळतात. हवेत दव असल्यामुळे हे कण जड होतात. हवेचा थर आधीच खाली असतो आणि त्यात हवेतीला दवामध्ये हे कण मिसळव्यामुळे हवेचा थर आणखी खाली येतो. याला थर्मल इन्वर्जन असं म्हणतात, ज्यामध्ये हवेच्या वरच्या स्तरांमध्ये तापमान अधिक आणि खालच्या स्तरांमध्ये कमी, अशी स्थिती निर्माण होते आणि हवेला वरच्या थरामध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे विषारी कण बंदिस्त राहतात आणि जमिनीलगत पसरतात. तापमान जास्त असतं त्यावेळी हवेत आर्द्रता कमी असते. त्यामुळे हवा कोरडी असते आणि हे धुलीकण हवेच्या वरच्या थरामध्ये जातात. हिवाळ्यात हा धोका अधिक असतो.
औद्योगिक प्रकल्प, वाहने, यांत्रिक उपकरणे यामधून मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होतं. मुंबई, नवी मुंबई, दिल्ली सारख्या महानगरांमध्ये याचे परिणाम दिसू लागले आहेत. हिवाळ्यात घरांमध्ये उष्णता टिकवण्यासाठी जळणाचा वापर वाढतो, त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढतं, खासकरून ग्रामीण भागांमध्ये, परंपरागत जळणांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, ज्यामुळे हवेतील PM पातळी वाढते.
हवेतील विषारी घटक मिसळल्यामुळे प्रदूषणाच्या वाढत्या पातळ्यामुळे विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. श्वसनाचे आजार, जसे की दमा, फुफ्फुसांचे विकार, आणि हृदयविकार यांचे प्रमाण वाढते. तसेच, प्रदूषणामुळे संज्ञानात्मक विकार, हृदयरोग, आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो.