Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Animation Day : ॲनिमेशन कधीपासून सुरू झाले? बारावीनंतर उत्तम करिअर पर्याय, आणि पगार ‘इतका’ आहे

दरवर्षी 28 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. ॲनिमेशन हा प्रकार सुरुवातीला व्यावसायिक रंगभूमीवर सुरू झाला, परंतु आता तो थ्रीडी आणि स्पेशल इफेक्ट्ससह मोठ्या पडद्यावर पोहोचला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 28, 2024 | 08:49 AM
Animation Day When did animation start Great career options after 12th, and the salary is so

Animation Day When did animation start Great career options after 12th, and the salary is so

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी 28 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. ॲनिमेशन हा प्रकार सुरुवातीला व्यावसायिक रंगभूमीवर सुरू झाला, परंतु आता तो थ्रीडी आणि स्पेशल इफेक्ट्ससह मोठ्या पडद्यावर पोहोचला आहे. आजही काही लोक ॲनिमेशनला फक्त कार्टूनच मानतात, परंतु व्यंगचित्र ही ॲनिमेशनची फक्त एक छोटी शाखा आहे. या दिवशी ॲनिमेशनचा सन्मान केला जातो आणि ॲनिमेशनच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.

आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनाची सुरुवात 2002 साली आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड फिल्म असोसिएशनने (Association Internationale du Film d’Animation) केली होती. 28 ऑक्टोबर हा दिवस निवडण्यामागे कारण असे आहे की, याच दिवशी, 1892 साली चार्ल्स-एमिल रेनॉड यांनी पॅरिसमधील ग्रेविन म्युझियममध्ये पहिल्या ॲनिमेटेड चित्रपटाचे प्रक्षेपण केले होते. त्यावेळी “पँटोमाइम्स ल्युमिनस” हा त्यांचा कार्यक्रम होता, ज्यात ‘पौव्रे पिएरोट’, ‘अन बॉक’, आणि ‘ले क्लाउन एट सेस चियन्स’ या तीन चित्रपटांचा समावेश होता. यानंतर 1895 मध्ये ल्युमिएर बंधूंच्या सिनेमॅटोग्राफने या तंत्रज्ञानाला मागे टाकले, पण रेनॉड यांच्या या प्रयोगाने मनोरंजन क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले.

Animation Day : ॲनिमेशन कधीपासून सुरू झाले? बारावीनंतर उत्तम करिअर पर्याय, आणि पगार ‘इतका’ आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी आहे. आजकाल ॲनिमेशनची मागणी चित्रपट, जाहिराती, गेम्स आणि वेब सिरीजमध्ये वाढत चालली आहे. ॲनिमेशन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम ते तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बारावीनंतर थ्रीडी ॲनिमेशन सर्टिफिकेट, सीजी आर्ट्स, टूडी सर्टिफिकेट, ‘एडिटिंग, मिक्सिंग आणि पोस्ट प्रोडक्शन वर्क्स’ आणि व्हीएफएक्स यांसारखे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत, जे 3 ते 6 महिन्यांत पूर्ण करता येतात. याशिवाय, बीएससी इन ॲनिमेशन, बीए इन ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझाईन, बी.डेस. इन ॲनिमेशन आणि डिजिटल फिल्ममेकिंग अशा अनेक पदवी अभ्यासक्रमांमध्येही शिक्षण घेता येते.

हे देखील वाचा : World Day of Audiovisual heritage, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि थीम

नोकरीच्या संधींचा विचार करता, ॲनिमेशन क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी कंपन्या फ्रीलान्स किंवा पूर्णवेळ ॲनिमेटरची नियुक्ती करतात. ॲनिमेशनमध्ये क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञानाची समज असलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात चांगले करिअर करता येते. ॲनिमेटर, टेक्सचर आर्टिस्ट, गेम डिझायनर, 3D/2D ॲनिमेटर, इमेज एडिटर, लाइटिंग आर्टिस्ट, की फ्रेम ॲनिमेटर, स्पेशल इफेक्ट्स आर्टिस्ट अशा विविध भूमिका यात उपलब्ध आहेत, ज्यात सुरुवातीला 40,000 ते 55,000 रुपये पगार मिळू शकतो.

हे देखील वाचा : किती मोठा विध्वंस करू शकते ‘दाना’ चक्रीवादळ? जाणून घ्या कशी तयार होतात ही वादळे

आज आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा करण्यामागचा उद्देश ॲनिमेशनच्या माध्यमातून मनोरंजन आणि कला क्षेत्रात होणाऱ्या बदलांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आहे. यानिमेशन क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आणि यामुळे मनोरंजन क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत.

Web Title: Animation day when did animation start great career options after 12th and the salary is so nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 08:49 AM

Topics:  

  • day history

संबंधित बातम्या

World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण
1

World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व
2

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

Engineer’s Day: भारताच्या पहिल्या सिव्हिल इंजिनिअरला समर्पित आहे ‘हा’ खास दिवस; जाणून घ्या यामागची रंजक कहाणी
3

Engineer’s Day: भारताच्या पहिल्या सिव्हिल इंजिनिअरला समर्पित आहे ‘हा’ खास दिवस; जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

International Day of Democracy : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
4

International Day of Democracy : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.