Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीलम संजीव रेड्डी: इंदिरा गांधींशी मतभेद, राजकारणातून निवृत्ती आणि नंतर राष्ट्रपतीपदी निवड

नीलम संजीव रेड्डी हे स्वतःच्या वेतनाचा ७० टक्के हिस्सा सरकारी निधीत जमा करत. त्यांच्या वैयक्तिक सेवेसाठी त्यांनी कोणतेही अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले नाहीत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 19, 2025 | 12:13 PM
नीलम संजीव रेड्डी: इंदिरा गांधींशी मतभेद, राजकारणातून निवृत्ती आणि नंतर राष्ट्रपतीपदी निवड
Follow Us
Close
Follow Us:

आज भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांची जयंती. रेड्डी यांचा जीवनप्रवास हा एक विलक्षण राजकीय आणि नैतिक आदर्श ठरतो. १९६९ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी थेट आपल्या आंध्रप्रदेशातील मूळ गाव इलूर येथे परतले. गावी जाऊन त्यांनी शेती सुरू केली होती. त्यांनी सियासतपासून संन्यास घेतला होता. मात्र, ८ वर्षांनी नशीबाने पलटी घेतली आणि ते निर्विरोध राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.

सत्तेच्या शिखरावरही साधेपणा

राष्ट्रपती असताना रेड्डी यांनी राष्ट्रपती भवनात केवळ एका खोलीत वास्तव्य केले. इतक्या मोठ्या वास्तूत राहूनही ते विलासी जीवनशैलीपासून दूर होते. ते इतर खोल्या रिकाम्या ठेवण्याची इच्छा व्यक्त करत. लोकशाहीतील सर्वोच्च पदावर असूनही त्यांनी साधेपणाचा आणि पारदर्शकतेचा आदर्श प्रस्थापित केला.

वेतनाचा ७०% भाग सरकारी निधीत

नीलम संजीव रेड्डी हे स्वतःच्या वेतनाचा ७० टक्के हिस्सा सरकारी निधीत जमा करत. त्यांच्या वैयक्तिक सेवेसाठी त्यांनी कोणतेही अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले नाहीत. सामान्य माणसालाहीआपल्याला सहजपणे भेटता यावे, यासाठी त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे जनतेसाठी खुले ठेवले होते.

Jyoti Malhotra Latest News : ज्योती मल्होत्राचे सीक्रेट मिशन; गुप्तहेरीच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तान दौरा

जवाहरलाल नेहरूंचे निकटवर्ती, आंध्रचे पहिले मुख्यमंत्री

नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील संपन्न शेतकरी कुटुंबात झाला. ते महात्मा गांधींनी प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंचे निकटवर्ती म्हणून त्यांचा उदय झाला. १९५६ मध्ये आंध्र प्रदेश राज्य स्थापन झाल्यावर, ते पहिले मुख्यमंत्री झाले. नंतर केंद्रात शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

इंदिरा गांधींसोबत मतभेद, राष्ट्रपती निवडणुकीतील पराभव

पण १९६७ मध्ये लोकसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन १९६९ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली, मात्र इंदिरा गांधींशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी वी. व्ही. गिरि यांना पाठिंबा दिला. इंदिरा गांधींच्या ‘अंतरात्मेची आवाज’ मोहिमेमुळे रेड्डी यांचा पराभव झाला. यामुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानंतर पुनरागमन

१९७५ मध्ये जयप्रकाश नारायणांच्या ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनाने देशातील राजकारण ढवळून निघाले होते. याच दरम्यान जेपींच्या आग्रहाने रेड्डी यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १९७७ मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश करून नांदयाल मतदारसंघातून लोकसभेत विजय मिळवला. आंध्र प्रदेशातून जनता पक्षाची ही एकमेव जागा होती.

500 वर्ष जुना आयुर्वेदिक रामबाण उपाय! संपूर्ण शरीरातील सडलेली घाण करेल क्लीन, इन्फ्लेमेशनही होईल दूर

निर्विरोध राष्ट्रपती, सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती

१९७७ मध्ये रेड्डी यांना जनता पक्षाने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार केले आणि ते निर्विरोध निवडून आले. ते ६४ व्या वर्षी भारताचे राष्ट्रपती झाले — त्या वेळचे सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोरारजी देसाई, चरण सिंग आणि इंदिरा गांधी अशा तीन पंतप्रधानांबरोबर काम केले.

स्वखुशीने सरकारला जमीन दिली

नीलम संजीव रेड्डी हे एक जमीनदार घराण्याचे होते, तरीही त्यांनी नंतर आपली ६० एकर जमीन सरकारला दान केली. त्यांच्या गावाची स्थिती मात्र विशेष बदलली नाही, असे नोंदवले जाते.

तिखट निरोप भाषण आणि निधन

१९८२ मध्ये कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, आपल्या निरोप भाषणात त्यांनी तत्कालीन सरकारांच्या अपयशावर उघडपणे टीका केली. त्यांनी म्हणाले की, “जनतेची परिस्थिती सुधारण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले.” त्यांनी मजबूत विरोधकांची गरज अधोरेखित केली. १ जून १९९६ रोजी, निमोनियामुळे त्यांचे निधन झाले.

Web Title: Former president of india neelam sanjeeva reddy biography political journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Indira Gandhi

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘हा’ विक्रम; पुढचे लक्ष्य असणार पंडित नेहरु
1

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘हा’ विक्रम; पुढचे लक्ष्य असणार पंडित नेहरु

50 Years of  Emergency: १९७५ पूर्वीही देशात दोनदा लागू झाली होती आणीबाणी; कधी माहिती आहे का?
2

50 Years of Emergency: १९७५ पूर्वीही देशात दोनदा लागू झाली होती आणीबाणी; कधी माहिती आहे का?

बाळासाहेब ठाकरे अन् तत्कालीन RSS सरसंघचालकांचा आणीबाणीला पाठिंबा? शिवसेनेच्या नेत्याचा अजब दावा
3

बाळासाहेब ठाकरे अन् तत्कालीन RSS सरसंघचालकांचा आणीबाणीला पाठिंबा? शिवसेनेच्या नेत्याचा अजब दावा

50 years of Emergency: आणीबाणीची ५० वर्षे; आजच्याच दिवशी झाली होती आणीबाणीची घोषणा; कसा होता स्वतंत्र भारताचा काळा इतिहास
4

50 years of Emergency: आणीबाणीची ५० वर्षे; आजच्याच दिवशी झाली होती आणीबाणीची घोषणा; कसा होता स्वतंत्र भारताचा काळा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.