Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondwana fingerprints: पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठा शोध; गोंडवाना या भारतीय उपखंडात सापडले 80 कोटी वर्षे जुने ठसे

Gondwana fingerprints: 'डीप-टाइम डिजिटल अर्थ' नावाच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने हा शोध लावला आहे. या गटाने त्या प्रदेशातून हजारो मॅग्मॅटिक खडक गोळा केले आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक डेटाबेस तयार केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 12, 2026 | 11:30 AM
Gondwana supercontinent discovery 2026

Gondwana supercontinent discovery 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘महाखंड’ गोंडवानाची मोठी व्याप्ती
  • एआय (AI) आणि २५ हजार खडकांचा अभ्यास
  • जीवसृष्टीच्या उदयाचा संबंध

पृथ्वीच्या निर्मितीनंतरच्या भूगर्भीय इतिहासात अनेक मोठाले महाखंड तयार झाले आणि काळाच्या ओघात विखुरले गेले. यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अथांग भूभाग म्हणजे ‘गोंडवाना'(Gondwana fingerprints). भारतीय उपखंड, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे देश एकेकाळी याच गोंडवानाचा भाग होते. नुकत्याच ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ (Science Advances) या प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार, शास्त्रज्ञांनी गोंडवानाच्या रचनेबद्दल एक क्रांतीकारक आणि थक्क करणारा खुलासा केला आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांना गोंडवानाच्या प्राचीन सीमांचे महत्त्वपूर्ण अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांचा असा मानण्याकडे कल होता की, गोंडवानाने तत्कालीन पृथ्वीच्या भूभागापैकी केवळ दोन-तृतीयांश (सुमारे ६५%) भाग व्यापला होता. मात्र, नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, ८०० ते ५०० दशलक्ष (८० ते ५० कोटी) वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या गोंडवाना महाखंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी तब्बल ८० टक्के भाग व्यापला होता.

‘डीप-टाइम डिजिटल अर्थ’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) शोधप्रवास

हा अभूतपूर्व शोध ‘डीप-टाइम डिजिटल अर्थ’ (Deep-Time Digital Earth) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक गटाने लावला आहे. चायनीज अकॅडमी ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसचे प्राध्यापक ताओ वांग आणि कर्टीन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक विल्यम कॉलिन्स यांच्या नेतृत्वाखालील टीमने जगभरातून २५,००० पेक्षा जास्त प्राचीन मॅग्मॅटिक खडकांचे नमुने गोळा केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

भूगर्भीय हालचालींमुळे लाखो-करोडो वर्षांत गोंडवानाचे तुकडे जगभरातील विविध खंडांमध्ये आणि पर्वतांमध्ये विखुरले गेले होते. हे खडक नेमके केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत तयार झाले, हे शोधण्यासाठी संशोधकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि प्रगत डेटाबेस तंत्रज्ञानाचा वापर केला. एआयच्या साह्याने या खडकांची मूळ स्थाने निश्चित करण्यात आली आणि प्राचीन पृथ्वीचा एक डिजिटल नकाशा तयार करण्यात आला.

‘सॅमॅरियम-निओडिमियम’ आयसोटोप: भूगर्भातील टाइम मशीन

शास्त्रज्ञांनी गोंडवानाचा हा नकाशा शोधण्यासाठी सॅमॅरियम (Samarium) आणि निओडिमियम (Neodymium) या मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा (Isotopes) वापर केला. हे आयसोटोप्स गोंडवानाच्या मूळ खडकांची एक प्रकारची “रासायनिक स्वाक्षरी” किंवा “फिंगरप्रिंट” म्हणून काम करतात. या संशोधनातील प्रमुख लेखक कॉलिन्स यांनी या सॅमॅरियम-निओडिमियम आयसोटोपिक नकाशाला “भूतकाळात घेऊन जाणारे टाईम मशीन” असे संबोधले आहे. केवळ २० दशलक्ष वर्षांपूर्वी बनलेल्या नवीन पर्वतांमध्ये दडलेले ५० कोटी वर्षांपूर्वीचे प्राचीन खडक ओळखणे या फिंगरप्रिंट तंत्रज्ञानामुळे शक्य झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

कँब्रियन स्फोट आणि पृथ्वीवर जीवसृष्टीचा विकास

या शोधातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गोंडवानाची निर्मिती आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विकास यांचा असलेला थेट संबंध. सुमारे ५३८ दशलक्ष (५३.८ कोटी) वर्षांपूर्वी पृथ्वीवर ‘कँब्रियन स्फोट’ (Cambrian Explosion) झाला होता, ज्या काळात पृथ्वीवर अचानक विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या आणि मोठ्या जीवांचा उदय झाला. त्यापूर्वी अब्जावधी वर्षे पृथ्वीवर केवळ साधे सूक्ष्मजीव अस्तित्वात होते.

गोंडवाना महाखंडाच्या निर्मितीदरम्यान पृथ्वीच्या परिघाच्या सुमारे ७९% भागात प्रचंड भूगर्भीय हालचाली झाल्या आणि एक प्राचीन ‘रिंग ऑफ फायर’ (अग्नीचे वलय) तयार झाले. या रिंग ऑफ फायरमधील ज्वालामुखींच्या सततच्या उद्रेकांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ यांसारखे वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. यामुळे अतिथंड असलेली पृथ्वी उबदार झाली आणि या हवामान बदलामुळेच पृथ्वीवर गुंतागुंतीची जीवसृष्टी बहरण्यास पोषक वातावरण तयार झाले.

Web Title: Gondwana fingerprints supercontinent 80 percent earth landmass ai discovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

12 September Historical Events: आज दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन; जाणून घ्या १२ सप्टेंबरचा इतिहास..
1

12 September Historical Events: आज दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन; जाणून घ्या १२ सप्टेंबरचा इतिहास..

World Dolphin Day: सागरी परिसंस्थेचे रक्षक असलेल्या डॉल्फिनचे संरक्षण का आहे गरजेचे? जाणून घ्या याचे महत्त्व
2

World Dolphin Day: सागरी परिसंस्थेचे रक्षक असलेल्या डॉल्फिनचे संरक्षण का आहे गरजेचे? जाणून घ्या याचे महत्त्व

Libraries Remember Day : नष्ट झालेल्या ज्ञानाच्या खजिन्याची आठवण आणि ग्रंथागारांचे संवर्धन; वाचा 11 सप्टेंबर का महत्त्वाचा?
3

Libraries Remember Day : नष्ट झालेल्या ज्ञानाच्या खजिन्याची आठवण आणि ग्रंथागारांचे संवर्धन; वाचा 11 सप्टेंबर का महत्त्वाचा?

Patriot Day 2026: अमेरिकेत 11 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो ‘पॅट्रियट डे’? वाचा यामागचा हृदयस्पर्शी इतिहास
4

Patriot Day 2026: अमेरिकेत 11 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो ‘पॅट्रियट डे’? वाचा यामागचा हृदयस्पर्शी इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.