Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day 2025: ‘लई अवघड उमगाया बाप’! मुलाच्या आयुष्यात बापाचे प्रेम… ,असंही जगून पहावं!

हल्लीच्या काळात नोकरी किंवा व्यवसाय करून आपले घरचा लवणारे कर्ते पुरुष म्हणून आता वडिलांची ओळख मर्यादित राहिलेली नाही. वडिलांची भूमिका मुलांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलत जात असते. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 15, 2025 | 09:12 AM
Father’s Day 2025: ‘लई अवघड उमगाया बाप’! मुलाच्या आयुष्यात बापाचे प्रेम… ,असंही जगून पहावं!
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/तेजस भागवत: आपल्या स्वप्नांना मागे ठेवून आपल्या लेकरांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आयुष्यभर अपार कष्ट करणारा देह म्हणजे आपले वडील. मुलांच्या, कुटुंबाच्या आनंदासाठी कायमच आपली स्वप्ने मागे ठेवणाऱ्या जगातील सर्व वडिलांना ‘फादर्स डे’ च्या शुभेच्छा. आपल्या आयुष्यात आपल्या बाबांचे स्थान हे अत्यंत खास आणि महत्वाचे असते.

अगदी जन्माला आल्यापासून मोठे होईपर्यंत मुलांचे/मुलींचे सर्व लाड पुरवण्यासाठी कष्ट करणाऱ्या वाडिलांबद्दल लिहिण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. हल्लीच्या काळात नोकरी किंवा व्यवसाय करून आपले घरचा लवणारे कर्ते पुरुष म्हणून आता वडिलांची ओळख मर्यादित राहिलेली नाही. वडिलांची भूमिका मुलांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलत जात असते.

वडील म्हणजे आपल्या कुटुंबाचा पाया आहे. वडील म्हणजे मुलाच्या मनात असलेला धीर, विश्वास. जेव्हा मी तुझ्या सोबत आहे असे वडील आपल्या लेकरांना सांगत असतात तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्याचा आत्मविश्वास हा गगनाला स्पर्श करणारा असतो. वडीलांशिवाय आपले कुटुंब पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशिवाय घराच्या चार भिंतींना घरपण येऊ शकत नाही.

वडील आणि मुलीचे नाते हे अत्यंत घट्ट नाते समजले जाते. मात्र आज मला वडील आणि मुलगा या नात्यावर थोडेसे व्यक्त व्हावेसे वाटते. वडील आणि मुलगा यांच्यातील नाते थोडेसे अनोखे असते असे मला वाटते. मुली ज्या पद्धतीने आपल्या भावना आणि मनातील एखादी गोष्ट मोकळेपणाने वडिलांना सांगू शकतात. मात्र मुलगा आपले म्हणणे मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता कायम सतावत असते. त्या प्रमाणात मुलगा आपल्या आईजवळ लवकर व्यक्त होतो.

मुलांना वडिलांशी बोलताना त्यांच्या कठोरपणाचा आणि शिस्तीचा धाक असतो. आदरयुक्त भीती मनात असते. वडिल कठोर असले तरी त्यांचे मन हे अत्यंत हळवे आणि भावुक असते. आपल्या मुलाला येणाऱ्या अडचणी, होणारे दु:ख हे सर्व आपल्याला वडिलांना माहिती असते. एका विशिष्ठ वयानंतर मुलांना वडिलांशी बोलताना थोडी आदरयुक्त भीती वाटत असते. कदाचित लहानपणी लावलेली शिस्त किंवा चूक झाल्यावर पडलेला ओरडा असेल यामुळे मुलांच्या मनात वडिलांच्याबद्दल एक आदरयुक्त अशी भीती राहते. त्यांना पटकन आपल्या मनातले सांगता येत नाही.

मात्र यावर थोडासा विचार केला असता वडिलांनी देखील आपल्या मुलाशी मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे. वडील म्हणून मुलावर धाक आणि लक्ष असलेच पाहिजे. पण त्यामध्ये आपल्याला मुलाला आपल्याशी मोकळेपणाने बोलता येईल अशी प्रेमाची किनार देखील असावी. त्यामुळे त्यांच्यातील नाते अजून सुदृढ आणि मजबूत होण्यास मदत होईल. मुलाला आपल्याशी सगळे काही व्यक्त करता यावे यासाठी मुलगा आणि वडील यांच्यात संवाद हा महत्वाचा दुवा ठरू शकतो.

वडिल म्हणजे साक्षात त्यागाची मूर्ती.  कुटुंबाच्या आनंदासाठी  आपले वडील त्यांच्या सर्व सुखांचा त्याग करतात. त्यांच्या आधाराशिवाय आपले आयुष्य अपूर्णच आहे.त्यांचा त्याग, कष्ट पाहता ‘लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं’ या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही.  त्यामुळे आज फादर्स डे च्या निमिताने आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवणाऱ्या, मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करणाऱ्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा..

Web Title: Happy fathers day 2025 father and childrens relation bonding best wishes navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:03 AM

Topics:  

  • Fathers Day
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
1

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
2

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
3

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
4

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.