High Court News:
प्रेमसंबंधांत अनेकदा अनेक जोडपी शारिरीक संबंध प्रस्थापित करतात पण नंतर काही कारणास्तव वेगळे झाल्यास पुरूषांना बलात्काराची धमकी दिली जाते. असे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणात महिला आणि पुरूष दोघांनाही मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशाच एका प्रकरणात अहलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिपण्णी दिली आहे. “दीर्घकालीन संमतीने प्रेमसंबंधात शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही.” असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महोबा जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या सहकारी लेखपालविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.
आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप पीडित महिलेने केला होता. पण, “सामाजिक कारणांमुळे लग्न करणे शक्य नाही, तरीही ती अनेक वर्षे तिच्या संमतीने संबंध ठेवते, तर ते बलात्काराच्या श्रेणीत टाकता येणार नाही,” असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
Vitamin D Deficiency: 206 हाडं म्हातारपणापर्यंत राहतील मजबूत, केवळ 16 रुपयात भरा शरीरात विटामिन
हे प्रकरण महोबा जिल्ह्यातील चरखारी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. २०१९ मध्ये, पीडितेने तिच्या सहकारी लेखपालवर वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तिला मादक पदार्थ पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तसेच, आरोपीने तिचा व्हिडिओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल केले. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले, परंतु चार वर्षांनंतर जातीचे कारण सांगून त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, असा आरोप महिलेने केला होता. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्याने तिने एससी/एसटी विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली. पण, विशेष न्यायालयानेही तिची याचिका फेटाळली, त्यानंतर तिने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी लेखापालच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद करताना काही महत्त्वाचे मुद्देही मांडले. “पीडितेने यापूर्वी पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून कारवाई करण्यास नकार दिला होता. जेव्हा आरोपीने पीडितेला त्याने दिलेले दोन लाख रुपये परत करण्यास सांगितले तेव्हा महिलेने पुन्हा सूडबुद्धीने ही तक्रार दाखल केली. त्यामुळे महिलेचे आरोप निराधार आहेत आणि महिला केवळ आर्थिक वादाचा बदला घेण्यासाठी हे करत असल्याचा आरोप आरोपीच्या वकिलांकडू करण्यात आला. या युक्तिवादाने खटल्याला नवे वळण मिळाले आणि न्यायालयाला दोन्ही पक्षांचे गांभीर्याने ऐकण्याची संधी मिळाली.
उच्च न्यायालयाने सुनावणीनंतर पीडितेची याचिका फेटाळली. तसेच, दोन्ही पक्ष दीर्घकाळ प्रेमसंबंधात होते आणि दोघांच्याही परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले होते. पण जर एखाद्या महिलेला माहित असेल की सामाजिक कारणांमुळे किंवा इतर अडथळ्यांमुळे लग्न शक्य नाही, तरीही ती स्वेच्छेने वर्षानुवर्षे संबंध ठेवते, तर त्याला बलात्कार म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. केवळ लग्नाचे आश्वासन देऊन संबंध ठेवणे नेहमीच बलात्कार नसतो, विशेषतः जेव्हा दोन्ही पक्ष संमतीने दीर्घकाळ एकत्र राहतात,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.