
Water Cloud in Space, Black Hole, Astronomy Discovery,
Water Cloud in Space: वैज्ञानिकांनी अंतराळात पाण्याचा एक प्रचंड मोठा ढग शोधून काढला आहे. हा ढंग अशा ठिकाणी आहे जिथे अद्याप कोणताही मानव किंवा अंतराळयान पोहोचू शकलेले नाही. हे ठिकाण पृथ्वीपासून १२ अब्ज प्रकाशवर्ष दूर आहे. या ढगामध्ये पृथ्वीवर असलेल्या सर्व महासागरांच्या एकत्रित साठ्यापेक्षा १४० लाख कोटी पट जास्त पाणी आहे. यावरून आपला विद्याचा विस्तार किती अफाट आहे, याची प्रचिती येते. हा ढग विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील आहे, जेव्हा आकाशगंगा तयार होत होत्या आणि कृष्णविवर आपल्या सभोवतालच्या वायूंना आकार देत होते. हा ढग एका ‘क्वासार’ भोवती आहे, ज्याच्या केंद्रस्थानी एक महाकाय कृष्णविवर आहे. है कृष्णविवर सूर्यपिक्षा २० अब्ज पट अधिक जड आहे. या कृष्णविवराच्या चहुबाजूंना उष्ण वायू असून त्यात पाण्याचे बाष्प मोठ्या प्रमाणात आहे.
या शोधामुळे वैज्ञानिक धक्क झाले आहेत, कारण पाणी हे जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. जर विश्वाच्या इतक्या सुरुवातीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी अस्तित्वात असेल, तर कदाचित जीवसृष्टीची सुरुवात आपल्या कल्पनेपेक्षा खूप आधी झाली असावी. हे सिद्ध करते की पाणी आणि जीवनासाठी आवश्यक घटक केवळ आपल्या सौरमालेपुरते मर्यादित नसून संपूर्ण विश्वात पसरलेले आहेत. हा ढग विश्वातील सुरुवातीच्या रासायनिक प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतो.
अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असलेला हा प्रकाश आपल्याला दाखवतो की विश्व किती जुने आणि रहस्यमय आहे. हा शोध आपल्याला जाणीव करून देतो की आपले ज्ञान अजूनही खूप कमी आहे. हा ‘कॉस्मिक क्लाउड’ केवळ एक वैज्ञानिक शोध नसून, तो एक संकेत आहे की विश्वात इतर ठिकाणीही जीवन असणे शक्य आहे. पाण्याचा इतका मोठा साठा पाहून आपण या विश्वात एकटे नाही आहोत, अशी आशा निर्माण होते.
ढगाबाबत थोडक्यात
अंतर पृथ्वीपासून १२ अब्ज
पाण्याचे प्रमाण पृथ्वीवरील सर्व समुद्रांच्या १४० लाख कोटी पट
स्थान एका महाकाय कृष्णविवराभोवती
निष्कर्ष : विश्वाच्या सुरुवातीच्या काळातही पाणी अस्तित्वात होते